Ahmednagar Crime News sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime News: नववधूसह नातेवाईकांची पैसे घेऊन धूम

Breaking Marathi Newsतरुणाने मांडली पोलिसांसमोर व्यथा सात जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : लग्न जमल्यानंतर वाङ्दत्त वधूच्या नातेवाईकांनी दोन लाखांची मागणी केली. विवाहेच्छू तरुणानेही वेळोवेळी एक लाख ८५ हजार नातेवाईकांना दिले. थाटामाटात लग्नही लागले.

नातेवाईकांना घेऊन वधू सासरी आली. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी मध्यरात्री पैशांसह वधू व नातेवाईकांनी धूम ठोकली. सात महिने होऊनही वधू न परतल्याने तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

चंदू सीताराम थोरात (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), भाऊसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), श्‍याम वाबळे (रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, ता. कळनोरी, हिंगोली), सुनील शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), राहुल पाटील व सोनी शंकर पाटील (दोघेही रा. आनंदनगर, सारसी बडनेरा, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.

एका विद्यापीठात कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून हा तरुण काम करत आहे. त्याच्या लग्नासाठी घरातील नातेवाईक मुलगी पाहात होते. एका नातेवाईकाने दूरध्वनीवरून ‘मुलगी पाहिली आहे. दोन लाख रुपये लागतील,’ असे सांगितले. (Latest Ahmednagar news)

तरुण आई-वडिलांसह पारनेर येथे गेला. तेथे त्यांना मुलगी हिंगोली येथील असल्याचे सांगण्यात आले. तीन जुलै २०२२ ला तरुण आई-वडील, नातेवाईकांसह कळनोरी (जि. हिंगोली) येथे मुलीच्या घरी गेले.

अनिता अग्रवाल यांच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. एकमेकांची पसंती झाली. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी दोन लाखांची मागणी केली. तरुणाने वेळोवेळी एक लाख ८५ हजार रुपये दिले. त्यानंतर ५ जुलै २०२२ ला सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, अमरावती) हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला.

तरुण वधूला घेऊन राहुरीत आला. ८ जुलै २०२२ला वधूचे नातेवाईक तमनर आखाडा येथे मुक्कामी आले. रात्री जेवण करुन सर्वजण एकाच खोलीत झोपले. मध्यरात्री एक वाजता नातेवाईकांसह वधू घरातून गायब झाल्याचे लक्षात आले.

दुसऱ्या दिवशी शोध सुरू झाला. ‌मध्यस्थांनी दोन-तीन दिवसांत मुलीला तुमच्या घरी आणून घालू, असे सांगितले. परंतु, सहा महिने झाले. वधू परतलीच नाही. त्यामुळे या तरुणाने शुक्रवारी (ता. १७) राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(Latest Marathi News)

मुलींची संख्या कमी झाल्याने असे प्रकार वाढले आहेत. मध्यस्थ दलाल गैरफायदा घेत आहेत. त्यांच्यापासून सावध राहावे. खात्री असल्याशिवाय असे व्यवहार व विवाह करू नयेत. शंका असल्यास स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

- मेघशाम डांगे, पोलिस निरीक्षक राहुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT