Ahmednagar flyover approved in eight days 
अहिल्यानगर

खासदार विखे पाटील म्हणतात, दिल्लीला गेलो असतो तर उड्डाण पुलाची वर्क अॉर्डरच आणली असती

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आता संरक्षण खात्याकडून आठ दिवसांत परवानगी मिळणार आहे. त्यासाठी आपण संरक्षण खात्यातील प्रमुखांना भेटून चर्चा केली. त्यामुळे उड्डाणपुलासाठी असलेली संरक्षणची अडचण दूर झाली आहे. भूसंपादनापोटी लष्कराला पैशांऐवजी त्यांच्या हद्दीत असलेली चार कोटींची कामे करून द्यावी लागणार आहेत. लॉकडाउनमुळे आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही. दिल्लीला गेलो असतो, तर उड्डाणपुलाच्या कामाची वर्कऑर्डरच घेऊन आलो असतो, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनसंबंधी वेळोवेळी योग्य निर्णय घेतले त्यामुळे देश वाचला आहे. त्यांचा लॉकडाउन करण्याचा उद्देश कोरोना संपविण्याचा नव्हता, तर लांबविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळी स्थिती होती. ती तयारी लॉकडाउनच्या काळात करून सोयी-सुविधा उभारण्यात आल्या. 

के के रेंज प्रश्नी न्यायालयात जाणार 

कें के रेंजच्या हद्दीत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला हा संरक्षणकडून नव्हे, तर राज्य शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. या अगोदर राज्य शासनाने संरक्षणच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या बदल्यात त्यांना जमिनी उपलब्ध करून देणे ठरलेले आहे. त्यामुळे के के रेंजमध्ये ज्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, त्याचा मोबदला शासनाने देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करून स्वखर्चाने या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहे. 

वर्षभरातील कामावर समाधानी 
वर्षभरात आपण श्रीगोंद्यासह तीन तालुक्‍यांतील माळढोक पक्षी अभयारण्याचे आरक्षण उठविले. त्याबरोबरच बायपासच्या कामासाठी 590 कोटींचा निधी मंजूर केला. सध्या या बायपासमुळेच लॉकडाउनही यशस्वी झालेले आहे. बायपासचेही काही काम झाले आहे. वर्षभरात फक्त सहाच महिने कामाची संधी मिळाली. त्यात केलेल्या कामावर समाधानी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : सटाणा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांचा आमरण उपोषण इशारा

SCROLL FOR NEXT