ahmednagar gutka ban police action drug case crime marathi news Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये गुटखा बंदीची ‘नौटंकी’!

एफडीए, पोलिस प्रशासनाची डोळेझाक; थातुरमातूर कारवायांमुळे विक्री थांबणार कशी?

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्यात बंदी असलेला अन्‌ परराज्यात उत्पादित होणारा गुटखा, सुंगधी तंबाखूसह इतर पदार्थांवर पोलिस कारवाई करतात. केव्हा तरी अन्न व औषध प्रशासनालाही कर्तव्याची जाण होते आणि तेही कारवाईचा दिखावा करतात.

अशा थातुरमातूर कारवाया करून गुटखाविक्री कधी बंद झाली का? असा प्रश्न आहे. बंदी असलेला मावा, गुटखा आणि सुंगधी तंबाखूची राजरोस विक्री केली जात आहे. केवळ टपऱ्याच नव्हे, तर चहा टपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये देखील सुंगधी तंबाखू व गुटख्याची विक्री होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची नौटंकी होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी शाळेच्या परिसरातील टपरीला विरोध केल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर महापालिका, पोलिस प्रशासन जागे झाले. शहरातील अनधिकृत टपऱ्या हटविण्यासाठी आयुक्तांनी मोहीम उघडली. मात्र, तरीसुद्धा शहरात सहजरित्या गुटखा व सुगंधी तंबाखू मिळते. (Latest Ahmednagar News)

गुटखा आयात करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट होते. गुटखा विक्री करणाऱ्यांवर अधूनमधून कारवाया होत असतात. पोलिसांना गुटखा सापडतो. विकणाऱ्यांवर कारवाईपण होते. मात्र, तरीही विक्री थांबत नाही.

शेजारील राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून हा माल चोरट्या मार्गाने राज्यात आयात होतो. गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत; परंतु त्यांच्याकडे जिल्ह्यासाठी केवळ चार अधिकारी आहेत. पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाईची मोहीम कडक केली जाऊ शकते; मात्र तसे कधीच होत नाही.

जुजबी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी गुटख्याचा टेम्पो पकडला होता. खर्डा, शेवगाव, नेवासे पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. जानेवारी २०२३ पासून गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या १०२ आरोपींना पोलिसांनी पकडले, ४८ गुन्हे दाखल केले. तरीसुद्धा सहज शहरात गुटखा व सुंगधी तंबाखू मिळते. याचा अर्थ कारवाया जुजबी स्वरूपाच्या असतात.

मुळावर घाव घालण्याची गरज

शहरासह जिल्ह्यात गुटखा विक्री सुरू नसल्याची टिमकी प्रशासनाकडून मिरवली जाते. मात्र, शहरात बिनबोभाटपणे विक्री सुरू होत असल्याचे पाहणीत समोर आले. सहजरित्या गुटखा मिळतो. गुटखा बंदीला अर्थ काय? जोपर्यंत मुळावरच घाव घातला जात नाही, तोपर्यंत हा प्रकार चालतच राहणार आहे.

पाहणीत काय आढळले?

  • शहरातील एका चौकातील टपरीवर गुटखा व तंबाखूची विक्री

  • तोफखाना पोलिस ठाण्याजवळील एका टपरीवर सर्रास गुटखा विक्री

  • उपनगरातील एका पान सेंटरवर गुटखा विक्री

  • माळीवाडा बसस्थानक परिसरात गुटखा मिळतो.

गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई सुरू आहे. यापुढे गुटखा विक्री शहरात होत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

- राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहमदनगर.

दहा दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. शहरात गुटखा विक्री होत असेल, तर कारवाई नक्कीच होईल. पोलिस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल.

- भूषण मोरे,सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT