Ahmednagar news
Ahmednagar news esakal
अहमदनगर

Ahmednagar : जलजीवन मिशन आले चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : ''हर घर नल, हर घर जल'' केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत श्रीगोंद्यात ८२ गावात नवीन पाणीपुरवठा योजना होत आहे. त्यासाठी चोवीस कामांचे कार्यारंभ आदेशही निघाले असून, इतर कामे निविदा प्रक्रियेत आहेत. २१ कोटींची हे चोवीस कामे सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आहेत. ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता कामांचे सर्वेक्षण व निविदा प्रक्रिया पार पडल्याचा आरोप होत आहे.

या योजनेतील दोन कोटी रकमेच्या आतील कामे जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाकडे तर त्यावरील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) कडे आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून समजलेल्या माहितीनुसार मढेवडगाव व बेलवंडी येथील योजना घोड धरणावरुन होणार आहेत. त्यासाठी सुमारे २८ कोटींचे अंदाजपत्रक आहे. काष्टी येथे एमजीपी चेच एक जलकुंभाचे काम सुरु आहे.

लघू पाटबंधारेचे प्रभारी उपअभियंता दगडू कांगुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चोवीस ग्रामपंचातींच्या जलजीवन मिशनच्या कामांचा कार्यारंभ आदेश निघालेला आहे. त्या पुढीलप्रमाणे : आनंदवाडी, बाबुर्डी, चांडगाव, देवदैठण, गार, घोडेगाव, घोटवी, घुगलवडगाव, हिंगणीदुमाला, कोळगाव व वाड्या, कोथूळ, मुंगुसगाव, पेडगाव, खरातवाडी, शिरसगावबोडखे, सुरेगाव, तांदळी, उक्कडगाव, चिखली, गव्हाणेवाडी, भानगाव, उखलगाव, चिखलठाणवाडी, कणसेवाडी.

दरम्यान कामांबाबत दहा टक्के लोकवर्गणी घ्यावा लागते व त्याचे पत्र ग्रामपंचायतीने द्यायचे असते. अशी किती पत्र प्राप्त झाले आहेत हे समजले नाही. कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांतील ठेकेदारांनी सादर केलेली अनुभव प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची तरदुत व्हावी अशीही मागणी आता पुढे येत आहे. रस्ते, बांधकाम करणारेच बहुतेक ठेकेदार जलजीवनच्या मिशनमध्ये असल्याने लोकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.

उपअभियंत्‍याची दहा वर्षांपासून जागा रिक्त

धक्कादायक म्हणजे श्रीगोंद्यात कोट्यावधी रुपयांची कामे सुरु होत असतानाही येथील लघू पाटबंधारेच्या उपअभियंताची जागा गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे. या उपविभागाचा तात्पुरता पदभार बांधकाम विभागाचे अभियंता दगडू कांगुणे यांच्याकडे आहे. ते बांधकाम विभागातील निष्णात अधिकारी असले तरी लघू पाटबंधारे विभागातील कारभारात परिपक्वता असणारा अधिकारी हवा हे निश्चित आहे.

माझ्याकडे तात्पुरता पदभार आहे. चोवीस कामांचे कार्यारंभ आदेश निघालेले आहेत. याबाबतची सगळी माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे आहे.

- दगडू कांगुणे, प्रभारी उपअभियंता लघू पाटबंधारे, उपविभाग श्रीगोंदे

ग्रामपंचायतीला या कामांमध्ये अंधारात ठेवले आहे. सर्व्हेक्षणात जी जागा सुचविली ती न घेता दुसरीच घेतली. गावकरी, ग्रामसेवक व सरपंच हे सहभागी असल्याशिवाय कामे सुरु करुन नयेत.

- शोभा मच्छिंद्र पवार, सरपंच चिखलठाणवाडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT