Ahmednagar News
Ahmednagar News Sakal
अहमदनगर

Ahmednagar News: दूधभेसळीचे धागे लांबवर ; आणखी चार जणांना अटक; बडे मासे बाहेरच

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्यातील दूधभेसळीचे धागे लांबवर जात असतानाच पोलिसांनी शहरातील चौघांना काल रात्री अटक केली. आणखी अनेक नावे रडारवर असली, तरी ‘दाग’ न पडता हा तपास करताना सत्य बाहेर काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

या भेसळीतील खरे व बडे मासे अजून बाहेरच आहेत. दूधभेसळ प्रकरण पुढे आल्यावर काही जिल्ह्यांतील भेसळसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. यात अनेक प्रतिष्ठित पुढे येण्याची शक्यता असल्याने, पोलिसांपुढच्या तपासाची गंभीरता वाढत आहे.

बाळासाहेब पाचपुतेच्या घरी टाकलेल्या छाप्यात अन्न व औषध प्रशासनाने दुधात मिसळले जाणारे अवैध साहित्य हस्तगत केले. त्यानंतर पाचपुते फरार झाला, मात्र संदीप मखरे पोलिसांच्या हाती लागला.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा जण चौकशीसाठी बोलाविले, त्यांतील चौघांना दीपक विठ्ठल मखरे (वय ३२), वैभव रामदास राऊत (वय २५), नीलेश तुकाराम मखरे (वय ३२) व संदीप बबन राऊत (वय ३६, सर्व रा. श्रीगोंदे) अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी झाले असून, त्यांतील एक जण फरार आहे.

अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यानंतर खऱ्याअर्थी पोलिसांची परीक्षा आहे, कारण हा भेसळीचा गोरखधंदा बिनधास्तपणे वर्षानुवर्षे सुरू असताना पोलिसांना कसा समजला नाही, त्यांची गोपनीय यंत्रणा कशी सुस्त राहिली, हे प्रश्न समोर आले.

निदान आता फिर्याद व पुरावे समोर येत असताना पोलिसांनी भक्कमपणे यातील सत्य उघड करावे, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. छापा व फिर्याद या दोन घटनांत तीस तासांचे अंतर असल्याने अनेक शंका घेतल्या जात आहेत.

पारनेर व शिरूर भागातील तो तरुण अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यासोबतच नगर व राहुरी येथील दोन जणांकडे पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. तेही पोलिसांपासून पळत आहेत. करमाळा व इंदापूर येथे या भेसळीचे मूळ आहे का, याचाही शोध सुरू आहे.

त्यातच शहरासह तालुक्यातील संशयितांची नावे पुढे येण्याचे प्रमाण जास्तच आहे. पोलिसांना हा गुन्हा उघड करताना सगळे समोर आणतानाच, त्यांच्याकडे संशयाने पाहिली जाणारी नजर रोखण्याचे काम करावे लागणार आहे.

छापा टाकल्यानंतर फिर्याद देण्यास वेळ लागला, कारण नमुने घेतल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल देऊन, त्यांची परवानगी घेऊन कायदेशीर कारवाई करावी लागते. आमचे काम आम्ही केले. पोलिसांनी आता तपास करावा, आम्ही त्यांना योग्य सहकार्य करू.

- उमेश सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT