जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड Sakal
अहिल्यानगर

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: ऍट्रॉसिटी तपासाचा अधिकार वरिष्ठांनाच

जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि सुनील जाधव या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि सुनील जाधव या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. या तिहेरी हत्याकांडात पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायदा लावलेला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार पोलिस उपअधीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठच या गुन्ह्याचा तपास करू शकतात. सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना या गुन्ह्याचा तपासाचा अधिकार नाही, असा बचावाचा पावित्रा वकिलांनी घेतला. (Ahmednagar Crime News Updates)

प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने ऍड. जी. एस. मगरे यांना ऍड. सी. एस. गवई, नितीन मोने, सिद्धार्थ उबाळे, शिवाजी शिंदे, ए. एम. चांदणे हे सहकार्य करत आहेत.

तपासी अधिकारी डॉ. गोर्डे यांनी गावातील अन्य संशयितांची घरझडती घेतली आहे. घरझडती घेण्यापूर्वी पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीला नोंदी काही वेळेस केलेल्या नाहीत. रामकिसन कराळे यांच्या घराची झडती घेतली आहे. मात्र, या झडतीचा पंचनामा दोषारोपपत्रात दाखल केला नाही.

गुन्हा घडलेल्या घटनास्थळाचे फोटो काढलेले आहेत. हे फोटो मोबाईलमधून काढलेले असल्यास मेमोरी कार्ड जमा करणे आवश्‍यक होते. फोटो डेव्हलप केले असल्यास त्याबाबतचे बिल जोडणे आवश्‍यक होते. याकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आणून दिले. संजय, जयश्री आणि सुनील या तिघांची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्टीलच्या परतीमध्ये माती भरून ज्या ठिकाणी रक्‍त सांडले होते. त्या ठिकाणी माती टाकली होती.

फोटोमध्ये ही स्टीलची परात घरासमोर दिसत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पंचनाम्यात कपाशीच्या शेतातून ही परात जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. फोटो आणि पंचनामा या दोन्हीमध्ये तफावत असल्याचा दावा केला. हत्याकांड झाले त्या ठिकाणची माती व रक्‍तमिश्रित माती, दगड जागेवर सील करणे आवश्‍यक होते. पोलिसांकडे या वस्तू सील करण्यासाठी आवश्‍यक साधने नव्हती, असा बचाव करण्यात आला.

मार्च महिन्यात सुनावणी

गेले तीन दिवस आरोपींच्या वकिलांचा बचावाचा युक्‍तीवाद सुरू आहे. साथीदार एक ते नऊ यांच्या साक्षीमधील विसंगती, पंचनामे करताना कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघन न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या खटल्याची सुनावणी आता ता. 2 ते 4 मार्च अशी सलग तीन दिवस होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT