sakal
अहिल्यानगर

Ahmednagar ZP Recruitment : झेडपी’त मेगा भरती; विविध ९३७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

गेल्या कित्येक वर्षांपासून डोळे लागून राहिलेली अहमदनगर जिल्हा परिषदेची भरतीची तारीख जाहीर झाली

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - गेल्या कित्येक वर्षांपासून डोळे लागून राहिलेली अहमदनगर जिल्हा परिषदेची भरतीची तारीख जाहीर झाली आहे. उद्या (शनिवार) त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तब्बल ९३७ पदांसाठीची ही भरती आहे.

आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदांबाबत ही जाहिरात आहे. ती सर्व पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत, अशी माहिती असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ विविध विभागांमधील आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी),

विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम/लघु पाटबंधारे), कनिष्ठ आरेखक, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका अशी पदे सरळ सेवा भरती २०२३ साठी उपलब्ध आहेत. गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी ५ ऑगस्टपासून आहे. त्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे.

  • एकूण पदे - ९३७

  • अर्जास प्रारंभ - ५ ऑगस्ट

  • अर्ज अंतिम मुदत २५ ऑगस्ट

  • परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग - १०००

  • मागास प्रवर्ग - ९००

  • माजी सैनिक, दिव्यांग - विनामूल्य

  • परीक्षा तारीख - संकेतस्थळावर कळणार

  • परीक्षा स्थळ - संकेतस्थळावर निवडावे

  • परीक्षा पद्धत - ऑनलाइन

  • पदांचे विवरण

  • आरोग्यसेवक - २२

  • आरोग्य सेवक (पुरुष हंगामी) - १८७

  • आरोग्य परिचारिका महिला - ४९६

  • औषध निर्माण अ. - २१

  • कंत्राटी ग्रामसेवक - ५२

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ३२

  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १

  • कनिष्ठ लेखा अधिकारी - ४

  • कनिष्ठ सहायक - १३

  • कनिष्ठ सहायक लेखा - १६

  • पशुधन पर्यवेक्षक - ४२

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १

  • लघुलेखक (उच्च श्रेणी)- १

  • वरिष्ठ सहायक लेखा - ७

  • विस्तार अधिकारी (कृषी) - १

  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) -४

  • स्था. अ. सहायक (बांध./लघुपाटबंधारे) - ३०

  • कनिष्ठ आरेखक - १

  • मुख्य सेविका/पर्यवेक्षिका - ६

अर्ज कसा करावा

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या लिंकवर २५ ऑगस्ट २३:५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.

जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती आदी बाबी जिल्हा परिषद, अहमदनगरच्या www.nagarzp.gov.in या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT