Ahmednagar Municipal Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : महापालिकेचा जन्म-मृत्यू विभाग कोमात; जन्मदाखल्यांसाठी पालकांची हेळसांड

शाळा सुरू होत असतानाच महापालिकेचा जन्म- मृत्यू विभाग कोमात गेला आहे. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी जन्म दाखला हवाय. पण तो मिळत नाही.

सकाळ वृत्तसेवा

- अरुण नवथर

अहमदनगर - शाळा सुरू होत असतानाच महापालिकेचा जन्म- मृत्यू विभाग कोमात गेला आहे. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी जन्म दाखला हवाय. पण तो मिळत नाही, अशी परिस्थिती महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात सुरू आहे. त्याबाबत अनेक पालकांनी थेट आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनाच जाब विचारला. त्यांनतरही या विभागाचे काम सुधारलेले नाही.

शाळा सुरू झाल्याने पालकांनी जुन्या महापालिका कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागात मोठी गर्दी केली आहे. जन्म-मृत्यू नोंदणीचे कामकाज आॅनलाईन होत असले, तरी पालकांना वेळेत जन्म दाखले मिळेनात.

काही नागरिक आई- वडील, भाऊ यांच्या मृत्यूचे दाखले घेण्यासाठी या विभागात चकरा मारत आहेत. खेड्यापाड्यातून आलेल्या या नागरिकांना या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काहींनी तर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना जाब विचारला. तासनतास उभे राहूनही कोणत्याही प्रकारचे दाखले मिळत नाहीत. जन्म, मृत्यूची नोंदणी, नावातील दुरूस्त्या ही महत्वाची कामे या विभागात होतात. मात्र, या विभागाकडून सध्या वेठीस धरले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यूचे दाखले देण्यात अडचण आली होती. परंतु आता ही अडचण दूर झाली आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, तशा सूचना या विभागातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

- डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी, महापालिका

मला नातवाचा जन्म दाखला काढायचा आहे. त्यासाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून चकरा मारत आहे. रीतसर अर्ज केला. पण दाखला वेळेत मिळत नाही. हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. लाईट नाही, जनरेटरची सुविधा नाही, अशी उत्तरे येथील कर्मचारी देत आहेत.

- आरिफ शेख, नागरिक, नगर

पालकांच्या तक्रारी

  • अधिकारी, कर्मचारी वेळेत येत नाहीत

  • पुरेशे मनुष्यबळ नसल्याचे कारणे पुढे करतात

  • पिण्याच्या पाण्याची, बसण्याची सुविधा नाही

  • स्वच्छतेचा अभाव, पालकांंशी असभ्य वर्तन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: संसदेत १२ ऑगस्टला FCRA विधेयक मांडले जाण्याची शक्यता

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT