Among the new changes made by ST Hirkani bus has been given the most preference by the passengers 
अहिल्यानगर

'हिरकणी'वर 'लाल परी'च भारी; निमआराम गाड्यांकडे पाठ फिरवत प्रवाशांची पसंती

दौलत झावरे

अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या निमआराम सेवेने (हिरकणी) प्रवाशांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य गाजविले. या बसला जादा दर देऊन चांगली सुविधा मिळत असल्यामुळे, प्रवाशांमधून तिलाच सर्वाधिक पसंती दिली जात होती. मात्र, आता निमआराममध्ये असुविधा जाणवू लागल्याने तिच्याऐवजी 'लाल परी'च चांगली, असे म्हणत प्रवासी निमआरामकडे पाठ फिरवू लागले आहेत.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
राज्य परिवहन महामंडळाची मुहूर्तमेढ एक जून 1968 रोजी रोवली गेली. कालपरत्वे एसटी प्रशासनाने बदल स्वीकारून प्रवासीभिमुख सेवा देण्याचा सदैव प्रयत्न केला. एसटीने 1982 मध्ये निमआराम (हिरकणी), त्यानंतर वातानुकूलित सेवा, व्होल्वो वातानुकूलित सेवा (शिवनेरी), भाडेतत्त्वावरील वातानुकूलित सेवा (शिवनेरी), शिवनेरी स्लीपर कोच, यशवंती (मिडी), शिवशाही व विठाई आदी सेवा सुरू केल्या. 

खासगीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून वेगवेगळे उपक्रम राबवून  प्रवाशांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एसटीने केलेल्या नव्या बदलाला प्रवाशांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. या बदलामध्ये सर्वाधिक पसंती प्रवाशांनी निमआराम (हिरकणी) बसला दिली. त्यामुळे 1982 पासून 2020 पर्यंत प्रवाशांच्या मनावर तिचे अधिराज्य अबाधित होते. 

या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आरामदायी व झटपट सेवा मिळत होती. मात्र, आता या सेवेला घरघर लागली असून, प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जादा दर देऊनही ही बस धीम्या गतीने धावू लागल्याने, आता प्रवासी निमआरामऐवजी 'लाल परी'ला पसंती देऊ लागले आहेत. एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 'विठाई' बसने आता निमआरामची जागा घेतली असून, प्रवाशांकडून या बसला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. 'विठाई' बसची संख्या वाढविण्याची मागणीही आता प्रवाशांकडून होऊ लागली आहे. 

प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रवाशांच्या तक्रारींचे स्वागत करून, पडताळणी करून दोष तत्काळ दूर करण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील. प्रवाशांना 'हिरकणी'तून चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करू. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर 

नगर जिल्ह्यातील बसची संख्या 

एकूण बस : 690 
साध्या बस : 623 
निमआराम (हिरकणी) : 13 
शयनयान : 13 
शिवशाही स्वमालकीच्या : 13 
शिवशाही भाडेतत्त्वावरील : 11 
मिनी बस : 8

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT