anna hazare esakal
अहिल्यानगर

असे अधिकारी पारनेरला नको; देवरेप्रकरणी हजारेंची नाराजी

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : ‘‘तहसीलदार ज्योती देवरे (tehsildar jyoti deore) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल (audio clip viral) झाल्यानंतर त्यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत, तसेच जास्त काळ तालुक्याला ठेवू नयेत,’’ अशा तीव्र शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे. वेळ पडली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीन, असे हजारे यांनी सांगितले.

आमदार लंके यांनी अण्णा हजारेंना दाखविला ‘तो’ अहवाल

तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. हजारे यांच्याशी चर्चा करताना आमदार लंके यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबतच्या गैरव्यवहारांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना सादर केलेला अहवाल हजारे यांना दाखविला. तहसीलदार देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करीत कसा भ्रष्टाचार केला, याचीही माहिती दिली. इतर जिल्ह्यांमध्ये तहसीलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते, याबाबतही लंके यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालाची प्रत अण्णांना दाखविली. या वेळी अण्णांनीदेखील त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत, वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडूनदेखील अण्णांनी याबाबतची माहिती घेतली आहे. - नीलेश लंके, पारनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Latest Marathi News Live Update : पूरग्रस्तांना भरघोस मदतीसाठी ठाण्यात ठाकरे गटाचे आंदोलन

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

3 Ingredient Kaju Katli for Diwali: यंदाची दिवाळी साजरी करा हेल्दी पद्धतीने; घरीच बनवा फक्त ३ पदार्थांपासून काजू कतली

SCROLL FOR NEXT