Approval for 250 households in Rahuri, Information of Minister Tanpure
Approval for 250 households in Rahuri, Information of Minister Tanpure 
अहमदनगर

राहुरीत सातशे घरकुलांना मिळणार एवढे अनुदान...मंत्री तनपुुरे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : राहुरी नगरपालिका हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात 233 घरकुलांना मंजुरी मिळाली होती. या घरकुलांना राज्य सरकारतर्फे प्रत्येक घरासाठी पहिल्या हप्त्याचे 40 हजार रुपये मिळाले होते. परंतु, केंद्र सरकारतर्फे एक रुपयाही मिळाला नव्हता.

आता, प्रत्येक घरासाठी राज्य सरकारतर्फे दुसरा हप्ता 60 हजार व केंद्र सरकारतर्फे पहिला हप्ता 60 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे, दीड वर्षापासून मंदावलेल्या योजनेला गती मिळेल, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

मंत्री तनपुरे म्हणाले, "प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राहुरी पालिका हद्दीत पहिल्या टप्प्यात 233 तर, दुसऱ्या टप्प्यात 460 घरकुलांना मंजुरी मिळाली. प्रत्येक घरासाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यात, केंद्र सरकारचा साठ टक्के (दीड लाख रुपये) व राज्य सरकारचा चाळीस टक्के (एक लाख रुपये) वाटा ठरला आहे.

दोन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे. त्यानुसार केंद्राचा पहिला हप्ता साठ हजार व दुसरा हप्ता नव्वद हजार; तर, राज्याचा पहिला हप्ता 40 हजार व दुसरा हप्ता 60 हजार प्रमाणे रक्कम मिळणार होती.‌ त्यानुसार, राहुरी पालिकेला 233 घरकुलांना राज्य सरकार तर्फे प्रत्येक घरासाठी पहिल्या हप्त्याचे 40 हजार रुपये प्रमाणे 93 लाख 20 हजार रुपये प्राप्त झाले.

लाभार्थ्यांनी घरकुलांच्या कामास सुरुवात केली. परंतु, केंद्र सरकार तर्फे एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे, दीड वर्षापासून योजनेचे काम रखडले होते. काल (बुधवारी) मुंबई येथे घरकुलाच्या प्रश्नावर बैठक घेतली. त्यात, पहिल्या टप्प्यातील घरकुलांसाठी राज्य सरकारने उर्वरित साठ हजार रुपये प्रमाणे दुसऱ्या हत्याची रक्कम नगरपालिकेस वर्ग करण्याचे ठरविले आहे.

केंद्र सरकारचे पहिल्या हप्त्याची रक्कमही पालिकेला वर्ग होणार आहे. त्यामुळे, योजनेला गती मिळणार आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यात मंजूर केलेल्या घरकुलांसाठी पहिल्या हप्त्याचे अकरा हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. पैकी, फक्त 750 कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले आहेत. असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT