Of the arsenic album-30 Seven and a half lakh families waiting 
अहिल्यानगर

कोरोनाची अौषधं जाऊ द्या... साडेसात लाख कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 मिळेना

दौलत झावरे

नगर  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आता ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांच्या वाटपाचा निर्णय घेऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असला, तरी अद्यापही त्या प्राप्त झालेल्या नाहीत. या गोळ्या कधी येणार, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून बचाव करायचा असेल, तर प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन होत आहे. या काळात प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून होत आहे.

अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे आयुष मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामविकास खात्याने गावागावांत या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील कुटुंबांची माहिती मागविली होती. 

जिल्ह्यात सात लाख 47 हजार 530 कुटुंबे असल्याची माहिती जिल्हा परिषदेने ग्रामविकास खात्याला दिली आहे. कुटुंबाच्या माहितीबरोबरच तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याजाची रक्‍कम ग्रामविकास खात्याला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पैशातून या गोळ्यांची खरेदी होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून चौदाव्या वित्त आयोगातील निधीवरील व्याजाची रक्कम संकलन करण्याचे काम सुरू आहे. ही रक्कम पाच ते सहा कोटींच्या घरात असण्याची शक्‍यता आहे. ही रक्‍कम जमा झाल्यानंतर ती ग्रामविकास खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असला, तरी अद्यापही अर्सेनिक अल्बम-30च्या गोळ्या प्राप्त झाल्या नाहीत. या गोळ्या कधी येणार याबाबतची माहिती आता गावा-गावांतून पंचायत समिती स्तरावर विचारली जात आहे. 

ग्रामविकास खात्याकडून ग्रामपंचायत हद्दीत किती कुटुंबे आहेत, याची माहिती मागविण्यात आली होती. ती पाठविण्यात आली असून, अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचा पुरवठा झाल्यानंतर त्वरित त्यांचे वाटप केले जाईल. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT