balasaheb thorat 
अहिल्यानगर

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : थोरात 

आनंद गायकवाड

संगमनेर ः कॉंग्रेस विचाराच्या काही संस्थांची "ईडी'कडून चौकशी होणार असल्याच्या बातम्या येत असल्याने, भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. "चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ व देशातील कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्याने, "ईडी'चा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे,' असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकाद्वारे केला आहे. 

पत्रकात म्हटले आहे, की राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी व 20 जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्र सरकारला सातत्याने जाब विचारला आहे. तसेच, इंधन दरवाढ व कोरोनाच्या संकटकाळात सरकारने तातडीने पावले उचलण्याचा सल्ला देऊनही सरकारने राहुल गांधी यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही. फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाही व दहशतीच्या मार्गाचा अवलंब करण्याची भाजप सरकारची नीती आहे. या दहशत व दडपशाहीला न जुमानता राष्ट्रहित व जनतेच्या हितासाठी कॉंग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करीतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापि यश येणार नाही. 

"राजगृह'ची तोडफोड करणाऱ्यांना अटक करा 
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जोडल्या गेलेल्या दादर येथील "राजगृह' या त्यांच्या निवासस्थानाची समाजकंटकांनी केलेली तोडफोड अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व राज्यघटनेवर श्रद्धा असलेल्या आमच्यासारख्या आंबेडकरी अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. "राजगृह'वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे,' अशी मागणी थोरात यांनी या पत्रकात केली आहे. अहमदनगर 
 

                                                                       संपादन - सूर्यकांत वरकड  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT