An Aurangabad bench of the Bombay High Court has directed that a case of murder be registered in the case of Suman Kale's death 
अहिल्यानगर

सुमन काळे मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवावा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावून दोषारोपपत्र दाखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
सुमन काळे या 14 मे 2007 रोजी बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तत्कालीन पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. सुमन काळे यांचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल करून खुनाचे कलम लावण्याची मागणी केली.

त्यावर न्यायालयाने आदेश देत खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावून दोषारोपपत्र सादर करावे. शासनाने काळे यांच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्यांत खटला निकाली काढावा, असा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT