Beating his wife; Husband suicide under train
Beating his wife; Husband suicide under train 
अहमदनगर

पत्नीच्या डोक्‍यात पाटा घालून त्याने केली रेल्वेखाली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : कौटुंबिक वादातून शहरालगतच्या दत्तनगरमध्ये घरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्‍यात आज दुपारी पाटा घालून पतीने रात्री आठच्या सुमारास रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. राजन गायकवाड असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी शिल्पा राजन गायकवाड (वय 21) या घटनेत गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तनगर येथील घरात आज दुपारी तीनच्या सुमारास शिल्पा गायकवाड झोपली होती. त्या वेळी कौटुंबिक वादातून पती राजन याने तिच्या डोक्‍यात पाटा घातला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सरपंच सुनील शिरसाठ यांच्यासह नागरिकांनी तिला सुरवातीला येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, आज रात्री आठच्या सुमारास शिल्पा हिचे पती राजन गायकवाड याने सूतगिरणी परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या मागे दोन मुली आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत क्षीरसागर यांची शिल्पा पुतणी आहे. याबाबत उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT