Bhanudas Murkute against the lockdown of Shrirampur 
अहिल्यानगर

भानुदास मुरकुटे श्रीरामपूरच्या लॉकडाउनविरोधात

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेत रविवार (ता.१३) पासून पुढील आठ दिवस शहरात लाॅकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला. परंतु सदर निर्णयानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आज लाॅकडाउनला विरोध दर्शवत व्यापार्यांना दुकाने खुले ठेवण्याचे आवाहन केले.

या संदर्भात मुरकुटे म्हणाले, शहरात लाॅकाडाउन करुन काही फायदा होणार नाही. माझ्या कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. जे नागरीक नियम पाळणार नाही. त्यांना कोरोनाचा संर्सग होण्याची दाट शक्यता आहे. 

आता पोलिस प्रशासनही कंटाळले आहे. आतापर्यंत नागरीकांना कोरोना संसर्गाचे गांर्भीय कळाले आहे. त्यामुळे शहर लाॅकडाउन करुन फारसा उपयोग होणार नाही. ज्यांना विनाकारण फिरायचे आहे, ते फिरणार आहे. सरकारकडून सर्व सेवासुविधा खुल्या केल्या जात असताना श्रीरामपूरात लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेणारे हे कोण, असा सवाल मुरकुटे यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील शेकडो कुटूंब हातावर पोट भरतात. पुन्हा लाॅकडाउन करणे छोट्या व्यावसायीकांना परवडणार नाही. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे ते लाॅकडाउनमध्ये घरात बसुन राहतील. परंतु लाॅकडाउन करुन गरीबांनी भिक मागायचे का. नियमांचे पालन करुन गरीबांना पोट भरु द्या, असे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे. त्यांनी शहरात लाॅकडाउन करण्यास विरोध दर्शविला आहे.

लाॅकडाउन पुर्वी दोन दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंतच बाजारपेठ खुली ठेवण्याचे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत केले होते. परंतू मुरकुटे यांनी आज स्वतः शहरातील मुख्य रस्त्यावर फिरुन नियमांचे पालन करुन दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे मुरकुटे यांच्या भुमिकेमुळे शहरात लाॅकडाउनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

खासदारही म्हणाले बैठकीनंतर निर्णय घ्या

खासदार सदाशिव लोखंडे आज शहरात आले असता त्यांनी पालिकेला धावती भेट दिली. त्यावेळी नगराध्यक्षा अनुराधा अादिक यांनी खासदार लोखंडे यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी यांच्याशी लाॅकडाउनबाबत संपर्क साधण्याची मागणी केली. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी फोनद्वारे चर्चा करुन पालिका, महसुल आणि पोलिस प्रशासन यांची लाॅकडाउन संदर्भात बैठकी घेवुन निर्णय घेण्याचे सांगितले. तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा मागविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले. 

दुकाने खुले ठेवा, पण नियम पाळा 

देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया लागु आहे. त्यामुळे शहर बंद ठेवणे चुकीचे असून लाॅकडाउनला आपला विरोध आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये व्यापार्यांनी सहभान नोंदवु नयेत. ज्यांना दुकाने खुली ठेवायची त्यांनी खुली ठेवावीत. अडचण आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. त्यामुळे मुरकुटे यांच्या भूमिकेमुळे लॉकडाउन संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

लॉकडाउन ठेवून काही उपयोग होणार नाही. नियमांचे काटेकोर पालन करा. मास्कचा नियमित वापर करा. हातांची स्वच्छता करा. घरासह परिसर नियमित स्वच्छ ठेवा. लाॅकडाउन केल्याने गरीबांची उपासमार होते. व्यावसायीकांना आर्थिक फटका बसत असल्याने लाॅकडाउन करणे चुकीचे असल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT