BREAKING - Eighteen corona patients in Ahmednagar today
BREAKING - Eighteen corona patients in Ahmednagar today 
अहमदनगर

ब्रेकिंग - नगरमध्ये आज अठरा कोरोनाबाधित, भिंगारला सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा

नगर ः आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.

नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे ०३, टीवी सेंटर ०१, फकिरवाडा ०१. पाइपलाइन रोड ०१ रुग्ण आढळून आला.
भिंगारमधील गवळी वाडा येथे ०७ रुग्ण आढळून आले. 
संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला.

पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला.

नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे. प्रत्येक तालुक्यात पुन्हा पुन्हा रूग्ण सापडत आहेत. परजिल्ह्यातून लागण झाल्याने ही संख्या वाढत आहे. परंतु आता त्यांच्यामुळे बाधित झालेल्या रूग्णांमुळे आपल्या परिवारातील किंवा कुटुंबातील लोकांना लागण होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून हे प्रमाण मोठे आहे. सुरूवातील आठ ते दहा पेशंट दररोज सापडत होते. परंतु नंतर एकदम २५ ते ३० रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. सर्वाधिक पेशंट संगमनेर तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ नगर शहरातील मध्य़वस्तीत तसेच पाईपलाईन रस्त्यालगतच्या पद्मानगर भागात आहेत. आजही तेथील आकडाच मोठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT