Candidates will have to re-submit the expenses for Gram Panchayat election expenses 
अहिल्यानगर

ग्रामपंचायत निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना पुन्हा खर्च

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यासाठी जिल्ह्यातील 23 हजार 818 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्वांना दैनंदिन निवडणूक खर्च व अंतिम एकत्रित निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. अंतिम खर्च घेताना १०० रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र घेण्याचा प्रयत्न काही शासकीय अधिकारी करीत आहेत. हा प्रकार शासनाच्या धोरणाविरोधात असून, जिल्ह्यातील उमेदवारांना 23 लाख 81 हजार 800 रुपयांचा यामुळे भुर्दंड बसणार असल्याचे श्रीगोंदे तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी सांगितले.

प्रा. दरेकर म्हणाले, शासनाने महसूल व वन विभागाकडील अधिसूचना जुलै-2004 अन्वये, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी, तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करायच्या अन्य सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे. या कामाकरिता मुद्रांक (स्टॅम्प पेपर) विकत घेण्याची गरज नसल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, सरकार यांनीही जाहीर केले आहे.

हे ही वाचा : लग्नासाठी सुंदर मुलीचं स्थळ चालून आलंय काय; औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला, बुलडाण्याच्या तरूणींनी काय केलं पहा
 
शासकीय धोरणाप्रमाणे ग्रामपंचायत उमेदवारांचा एकत्रित अंतिम खर्च घेताना त्यांचे शपथपत्र (घोषणापत्र) सध्या कागदावर घेणे गरजेचे आहे. त्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्‍यकता नाही. मात्र, शासकीय धोरणांचा अभ्यास न करणारे अधिकारी विनाकारण लाखो रुपयांचे स्टॅम पेपर घेण्यास भाग पाडत आहेत. ही बाब चुकीची आहे. श्रीगोंदे तालुक्‍यात 59 ग्रामपंचायतींमधील 567 जागांसाठी 2163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांचे अंतिम खर्च घेताना, त्यांना १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्यास भाग पाडल्यास, विनाकारण 2 लाख 16 हजार 300 रुपये भुर्दंड बसणार आहे. 

न्यायालयात धाव घेणार
 
शासनाच्या धोरणाविरोधात, विनाकारण १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर घ्यायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारात लक्ष घालून उमेदवारांचा भुर्दंड वाचवावा, अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्रा. दरेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT