A case has been registered against 21 people in Rahuri
A case has been registered against 21 people in Rahuri 
अहमदनगर

बनावट सोनेतारणप्रकरणी राहुरीत २१जणांवर गुन्हा दाखल, जिल्हा बँकेची फसवणूक

विलास कुलकर्णी

राहुरी : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांवर 34 लाख 45 हजार 500 रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल (शनिवारी) रात्री राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गोल्ड व्हॅल्युअरला रात्री तात्काळ पोलिसांनी अटक केली. त्याला राहुरी न्यायालयाने शनिवार (ता. 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आज दुपारी दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना उद्या (सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 
गोल्ड व्हॅल्युअर अरविंद विनायक नागरे (रा. टाकळीमिया) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

संदीप बाळासाहेब अनाप, दिगंबर धोंडीबा जाधव, राजेंद्र भाऊसाहेब थोरात, भास्कर भाऊसाहेब अंत्रे, ज्ञानदेव पंढरीनाथ शिंदे, दत्तात्रेय तुकाराम शेळके (सर्वजण रा. सोनगाव), शिवाजी लक्ष्मण अनाप, प्रेमकिरण संपतकुमार डुकरे, संजय रखमाजी बेल्हेकर, अविनाश आबासाहेब नालकर, अक्षय तुकाराम गडगे, दत्तात्रेय विठ्ठल सिनारे, सचिन तुकाराम निधाने (सर्वजण रा. सात्रळ), गणेश कैलास वांदे (कोल्हार बु.), राजेंद्र शिवाजी हारदे (रा. तिळापूर), मुनीफ अब्दुल शेख (रा. पाथरे बु.), संदीप हरिभाऊ सजन (रा. अनापवाडी), नवनाथ गोपीनाथ पठारे (रा. रामपूर), शिवाजी संपत संसारे (रा. निंभेरे), दत्तात्रेय विठ्ठल वाणी (रा. झरेकाठी) अशी आरोपींची नावे आहेत. पैकी दहा आरोपींना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले आहे. इतर दहा जण पसार आहेत. 

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळले आहे. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली.

बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोनगावचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या टप्प्यात 20 कर्जदारांसह सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, सोनगाव सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT