अहिल्यानगर

युरियाचे जादा पैसे घेताना कृषी दुकानदारास पकडले 

नीलेश दिवटे

कर्जत : युरियासाठी शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेताना, मिरजगाव येथील बीजांकुर कृषी सेवा केंद्रचालकास कृषी अधिकाऱ्यांनी पकडले. दुकानातून युरिया विक्रीवर बंदी घालण्यात आली. 

मिरजगाव येथील बीजांकुर कृषी सेवा केंद्रातून चढ्या दराने युरियाची विक्री होत असल्याची तक्रार सीतपूर येथील शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार, सुपेकर यांनी मिरजगाव येथील बीजांकुर सेवा केंद्रात सापळा रचला. युरियासाठी डमी ग्राहक पाठविले. 

युरियाची कमाल विक्री किंमत 265 रुपये 50 पैसे असताना, दुकानदाराने त्यासाठी 300 रुपये घेतले. नियमित बिलाऐवजी कच्चे बिल माथी मारले. पथकाने जादा पैसे घेताना, दुकानदारास पकडले. तेथील युरियाच्या 36 गोण्या जप्त केल्या. युरिया विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गुणनियंत्रक रूपचंद जगताप, मंडल कृषी अधिकारी सोनाली हजारे, कृषी पर्यवेक्षक प्रमोद काळदाते, सहायक श्‍याम अडसूळ यांनी सहभाग घेतला. 

सुपेकर म्हणाले, की तालुक्‍यातील परवानाधारक दुकानांवर अचानक छापा घालून तपासणी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अहमदनगर ,

                                                                      संपादन - सूर्यकांत वरकड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime Case : एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव; पेनड्राइव्हमध्ये सात महिलांचे 120 व्हिडिओ; महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Nanded News: जल जीवनची ६० टक्केच कामे पूर्ण; अनेक गावांवर पाणीटंचाईचे मळभ; आडात आहे, पण पोहऱ्यात येईना

Latur News: दापका राजा ते जळकोट रस्त्याची दुरवस्था; दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग; वाहनधारकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Orion Spacecraft Mission: अपोलो १३ चा विक्रम मोडला, चांदोमामाच्या मागे लपले ओरायन

SCROLL FOR NEXT