Confusion of tender process
Confusion of tender process 
अहमदनगर

नगर जिल्हा परिषदेत निविदा प्रकियेचा सावळा गोंधळ

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एका पाणीयोजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया दोनदा राबविली. विशेष म्हणजे, पहिली निविदा नामंजूर न करताच हे करण्यात आले. त्यानंतर पहिलीच निविदा अंतिम करून कामास मंजुरी देण्यात आली. या प्रकाराची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. 

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निविदा प्रकिया राबविली जाते. जिल्ह्यातील 53 लाखांच्या पाणीयोजनेच्या कामाचा प्रस्ताव सादर झाला होता. त्यासाठीची प्रक्रिया ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राबविली. त्यात चार-पाच जणांनी निविदा भरल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेवर काहींनी तक्रारी केल्या. त्यामुळे दुसऱ्यांदा प्रकिया राबविण्यात आली. मात्र, त्यावरही काहींनी आक्षेप घेतला. त्यामुळे दुसरी निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा पहिलीच ग्राह्य धरण्यात आली. आता या प्रक्रियेवरही आक्षेप घेतला गेला आहे.

अवश्य वाचा ः सकारात्मक... यात्रा-सप्ताहातील खर्च टाळून ग्रामविकासावर भर
 
पहिली निविदा रद्द केल्यावर दुसऱ्यांदा निविदा प्रकिया राबविण्याचे निर्देश आहेत. मात्र, नियमांना बगल देत, दुसऱ्यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर पहिलीच ग्राह्य धरण्यात आली. जिल्ह्यातील ठेकेदारांत या प्रकाराची चांगलीच चर्चा आहे. 

संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, जिल्ह्यातील एका पाणीयोजनेच्या कामासाठी दोनदा निविदा प्रक्रिया राबविली. त्यात पहिलीच निविदा अंतिम केली. या कामासाठी 53 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव होता. मात्र, प्रत्यक्षात हे काम 49 लाखांचे असून, तशी निविदा मंजूर झाली असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असते. 
- दत्तात्रेय गावडे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग , अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT