Corona blast in Ahmednagar: 24 in the city, Karjat-Jamkhed also active 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोना स्फोट ः शहरात २४, कर्जत-जामखेडही अॅक्टीव्ह

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात नगरमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. त्यानंतर विदेशातून आलेल्या वानोळ्यामुळे रूग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकजण काळजी घेत होता. प्रशासनही कडक उपाययोजना करीत होते. परंतु आता लॉकडाउन उठल्यानंतर कोरोनाचा स्फोट झाला आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतो आहे.

जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे.

नगर शहरात सिद्धार्थनगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४,  तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्या १०५ इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी घेतल ताब्यात

SCROLL FOR NEXT