Corporator Balasaheb Borate has demanded that the Municipal Corporation should set up Nehru Market on Chitale Road.jpg 
अहिल्यानगर

'एम आर आय'च्या निधीतून नेहरू मार्केट उभारा; नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची मागणी, तत्कालीन नगररचनाकारांवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला एमआरआय सेंटर चालविण्यासाठी तीन कोटींचा निधी दिला. त्यातून महापालिकेने 10 वर्षे जुने व अन्य ठिकाणी वापरलेले मशीन खरेदी करण्याचा घाट घातला. हे मशीन चालविण्यासाठी महापालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. त्यामुळे ते बसविण्यापेक्षा या निधीतून महापालिकेने चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट उभारावे, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली.

ते म्हणाले, 'नेहरू मार्केटची इमारत अतिशय चांगली होती. केवळ दुरुस्ती होणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिकेने ती पाडून टाकली. पाडकामासाठी महापालिकेला आठवडा लागला. इमारत एवढी मजबूत असतानाही ती का पाडली, याचे उत्तर महापालिका अधिकाऱ्यांनी द्यायला हवे. ही जागा केवळ 11 हजार चौरस फुटांची आहे. तत्कालीन नगररचनाकारांनी बेल्टिंग पद्धतीने जागेचे दर ठरविण्याचे निश्‍चित केले. ही बाब चुकीची होती. बेल्टिंग पद्धतीमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. त्यामुळे त्याविरोधात आम्ही आवाज उठविला होता. महापालिकेने ही इमारत स्वतः बांधून उत्पन्नाचे नवीन साधन तयार करावे.'

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त पदभार असताना, 'एमआरआय' मशीनसाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. महापालिकेला हा निधी देऊन 'एमआरआय' सेंटर चालविण्यास सांगितले. महापालिकेने 10 वर्षे जुने व अन्य ठिकाणी वापरलेले 'एमआरआय' मशीन खरेदी केले. ते बसविल्यास महापालिकेला उत्पन्न मिळण्याऐवजी खर्च वाढणार आहे. त्यामुळे स्थायी समितीनेही हे मशीन बसविण्यास परवानगी दिलेली नाही.

महापालिकेला ते चालविणे परवडणार नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा नियोजन समितीचा तीन कोटी रुपयांचा निधी नेहरू मार्केट बांधण्यासाठी वापरावा. महापालिकेने स्वतः नेहरू मार्केट बांधले, तर गाळ्यांच्या बुकिंगसाठी नागरिक पुढे येतील. त्या रकमेतून इमारत सहज उभी राहील,' असा विश्‍वास बोराटे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT