Crimes have been registered against 10 people for attacking a youth out of anger over an interracial marriage 
अहिल्यानगर

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी मुलीचे वडील, चुलते व भावासह 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यातील सात संशयित आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चारचाकी दोन वाहने, एक पिस्तूल, एअर गनसह तीन तीक्ष्ण हत्यारे जप्त केली. 

याबाबत नेवासे येथील तरुणाने नेवासे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आपण घरी असताना, घरासमोरून काही मोटारी वारंवार चकरा मारत असल्याचे आई व भावाच्या लक्षात आले. आपण दरवाजासमोर उभे असताना मोटारीतून 8 ते 10 जण तेथे आले. एकाने आपल्यावर पिस्तूल रोखले. इतरांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण हल्ला चुकवत घरात पळालो. 

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलिसांनी पाठलाग करून सात संशयितांना दोन वाहनांसह ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याकडे एक पिस्तूल, एअर गन व इतर तीक्ष्ण हत्यारे सापडली. दरम्यान, फिर्यादी तरुणाचा सोमवारी (ता. एक) आरोपींच्या घरातील मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला. या लग्नास मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. मुलीला परत पाठविण्यासाठी आरोपी वारंवार धमकी देत असल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT