Damage Banana Crop
Damage Banana Crop Sakal
अहमदनगर

वादळी पावसाने घातले थैमान

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - तालुक्यात दुसऱ्याच दिवशी मृग बरसला, मात्र त्यातील वादळ मोठे नुकसान करून गेले. काल (ता. ८) सायंकाळी वादळी पाऊस सुरवातीला श्रीगोंदे शहरात व नंतर तालुक्याच्या अनेक गावांत पोचला. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी रस्त्याकडेची झाडे कोसळल्याने रस्ते बंद राहिले. तालुक्यात सुमारे १३० खांब पडल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा विस्कळित झाला. घरांची व फळबागांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांची नुकसान झाले. शहरात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदे शहरासह पारगाव, माठ, म्हसे, देवदैठण, कोकणगाव, बनपिंप्री, घोगरगाव, म्हातारपिंप्री, लिंपणगाव या भागांत फळबागांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाली, तर घरांचे पत्रेही उडाले. पारगाव येथे रस्त्याच्या कडेचे झाड कोसळल्याने रस्ता अनेक तास बंद होता. तेथेच गावातील अनेक दुकानांचे नुकसान झाले. यात खतांच्या दुकानावरील पत्रे उडाल्याने खते भिजली. श्रीगोंदे-स्टेशन रस्ताही झाड पडल्याने काही काळ बंद होता. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ही प्राथमिक माहिती असल्याचे नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

वीजपुरवठा विस्कळित

दरम्यान, वादळात महावितरणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्रीगोंदे उपविभागात सुमारे तीस खांब पडले, तर बेलवंडी उपविभागात ९६ खांब व तीन रोहित्रे वादळात कोसळली. त्यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा रात्रीपासून विस्कळित होता. तो सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT