Death of Navradeva during the last Mangalashtak 
अहिल्यानगर

शेवटचं मंगलाष्टक सुरू असतानाच नवरदेव कोसळला अन मांडवाचं झालं स्मशान

नीलेश दिवटे

कर्जत : शेवटची मंगलाष्टक सुरू होते, आता सावध सावधान म्हणाल्यानंतर आपण आपल्या जीवनसाथीला पुष्पहार घालून कायमची अर्धांगिनी करण्याचे स्वप्न पाहत असताना नवरदेव अचानक कोसळला. आणि मांडवात एकच धावपळ उडाली.

आनंदाचे उधाण आलेल्या आणि पाहुणे मित्रमंडळी सगेसोयरे यांच्या उपस्थितीने भरगच्च भरलेल्या मांडवातील आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. क्षणातच स्मशान शांतता पसरली.  

तालुक्यातील चिलवडी येथील मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील पंचवीस वर्षांच्या युवकाबरोबर विवाह ठरला होता.आज ठरल्या दिवशी सर्व धार्मिक विधी सकाळी पार पडले. हळदी आणि इतर रंग उधळले गेले. डीजे तालावर नवरदेवासह मित्रमंडळीही नाचली.

दुपारी शुभविवाह सुरू झाला. वधू आणि वरांचे मामा पाठीमागे पुष्पहार आणि गुच्छ घेऊन उभे होते.दोन्ही विहीणबाई मोठ्या आनंदात पाहुण्यांचे स्वागत करीत होत्या. मान्यवरांनी आशीर्वाद देऊन झाले.

शेवटची मंगलाष्टकातील आता सावधान समयो...असे बोल म्हटले जात होते. तेवढ्यात वराच्या छातीत कळ निघाली तो खाली कोसळला. मांडवात एकच धांदल उडाली. आनंदाचे फुललेले चेहरे दुःखाने आक्रंदले.

तातडीने त्याला गाडीत घालून उपाचारासाठी नेले. परंतु काही वेळाने त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सारे होत्याचे नव्हते. झाले. मांडवात स्मशान शांतता पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT