Despite having a majority in the hands of many in Parner, there was great frustration at not being a member of that reservation. 
अहिल्यानगर

बहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत पद्धतीने काढण्यात आले. या वेळी अनेकांची लॉटरी लागली, तर काहींचे चेहरे मात्र हिरमुसले. अनेकांच्या हातात बहुमत असूनही, त्या आरक्षणाचा सदस्य नसल्याने मोठी निराशा झाली. 

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र, सरपंचदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने, सरपंचपद कोणाला, ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते. शेवटी सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी तीन, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व खुल्या प्रवर्गासाठी तीन, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 31 जागांपैकी 15 जागा खुल्या, तर 16 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खुल्या प्रवर्गात 71 जागांपैकी 36 जागा महिलांसाठी, तर 35 जागा खुल्या आहेत.

तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण असे :
 
अनुसूचित जाती प्रवर्ग
: पुरुष- जातेगाव, गुणोरे व घाणेगाव.
                                महिला- पाबळ, धोत्रे बुद्रुक, वाघुंडे बुद्रुक. 

अनुसूचित जमाती प्रवर्ग : पुरुष- म्हसे खुर्द, कुरुंद व वडगाव दर्या. 
                                    महिला- जामगाव, भोयरे गांगर्डा व वडझिरे.
 
नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष- कडूस, कासारे, वेसदरे, पिंप्री पठार, काताळवेढा, तिखोल, हिवरे कोरडा, मुंगशी, रुई छत्रपती, पानोली, रांधे, डिकसळ, वडनेर बुद्रुक, कळस व दैठणे गुंजाळ. महिला- हत्तलखिंडी, भांडगाव, वाळवणे, लोणी मावळा, पिंपळगाव रोठा, रांजणगाव मशीद, लोणी हवेली, पाडळी तर्फे कान्हूर, ढवळपुरी, राळेगण थेरपाळ, पिंपळगाव तुर्क, कान्हूर पठार, नांदूर पठार, नारायणगव्हाण, गोरेगाव, सांगवी सूर्या.
 
खुला प्रवर्ग : महिला- सिद्धेश्वरवाडी, करंदी, किन्ही, वडुले, गटेवाडी, सुपे, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळी आळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरी कासारे, बाभूळवाडे, दरोडी, निघोज, गांजीभोयरे, कोहकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे, पळसपूर, काळकूप, पळवे बुद्रुक, रायतळे, अस्तगाव, चिंचोली. पुरुष- पिंप्री जलसेन, वडगाव अमली, माळकूप, सारोळा आडवाई, अपधूप, हंगे, शहांजापूर, पिंपरी गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, पाडळी दर्या, जवळा, देवीभोयरे, शिरापूर, रेणवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, ढोकी, भोंद्रे, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वारणवाडी, वडगाव सावताळ, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुंडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT