Devotees coming to Shanidarshan have to endure obstacles and compulsions.jpg 
अहिल्यानगर

शनिभक्तांना 'लटकूं'च्या त्रासाची साडेसाती; पोलिस कारवाईला येतंय हद्दीचे विघ्न

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून शनिदर्शनाला येणा-या भाविकांना लटकूंच्या अडवणूक व सक्तीची साडेसाती सहन करावी लागत आहे. दोन पोलिस ठाणे असूनही हद्दीमुळे कारवाईला विघ्न येत आहे.

सध्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याने गावात व्यावसायिक स्पर्धा वाढली आहे. सध्या सोनई, घोडेगाव रस्ता व गावात २०० हून अधिक लटकू कार्यरत आहे. भाविकांच्या वाहनांचा पाठलाग करणे, वाहन आडवून पुजा साहित्यासाठी सक्ती करणे. पुजासाहित्य न घेतल्यास दमदाटी करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. गावातील तीनही बंद असलेल्या करनाक्यावर होणारी अडवणूक आजही सुरुच आहे.

ग्रामस्थ व भाविकांच्या वाढत्या तक्रारीनंतर शिंगणापूर पोलिस अधून-मधून रस्त्यावर दंडूका घेवून उतरतात. मात्र व्यावसायिकांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते लगेच पडद्याआड जातात. कारवाईत सातत्य राहत नाही. सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत लटकूंचे प्रमाण जास्त आहे. तेथे कारवाई होत नाही असे शिंगणापूर पोलिस सांगतात. तीन दिवसात सागर रमेश फुलारे (रा.सोनई) या एकट्या लटकूवर कारवाई झाली आहे. 

मी व पोलिस पथकाची फिरती गस्त सुरु आहे. गावात प्रबोधन फलक लावले. प्रवासी करनाक्यावर सुरक्षा रक्षक नेमावा, असे ग्रामपंचायतला कळविले आहे. आमच्याप्रमाणे सोनईतही कारवाई होणे आवश्यक आहे. 
- सचिन बागुल, सहायक पोलिस निरीक्षक, शिंगणापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT