कांदा बियाणे 
अहिल्यानगर

विद्यापीठाच्या अॉनलाईन कांदा बियाणे खरेदीचा झाला वांदा

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू झाली होती. मात्र, संगणकीय त्रुटींमुळे शेतकऱ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांचे जमा झालेले पैसे कंपनीच्या व विद्यापीठाच्या पोर्टलवर दिसत नसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांनी एकाच वेळी लॉगिन केल्यामुळे सर्व्हरवर लोड आला. परिणामी यंत्रणा कोलमडली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ऑनलाईन बियाणे विक्रीमध्ये संगणकीय अडचणीमुळे अधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. (Difficulties in purchasing onion seeds online from Rahuri University)

विद्यापीठाने ऑनलाइन विक्रीचे हे काम पुणे येथील आवर्ता स्ट्रॅटेजी या संगणक कंपनीस सोपविले होते. या कंपनीच्या चुकांमुळे विद्यापीठ व शेतकरी बियाणे विक्रीमध्ये हवालदिल झाल्याचे दिसून आले. संगणकतज्ज्ञांनी हा ऑनलाइन गोंधळ मिटविण्यासाठी थोडा वेळ लागेल असे विद्यापीठ अधिकाऱ्यांना सांगितले.

शेतकऱ्यांना सकाळी ११ ची व नंतर दुपारी तीनची वेळ देण्यात आली. मात्र, त्रुटी दूर न झाल्यामुळे यानंतर आता येत्या सोमवारी ता. १४ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून बियाणांची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असल्याचे डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.

दहा जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये संगणकीय अज्ञान दिसून आले. खाजगी कंपनीचे संगणकतज्ञ जसे सांगतील तसे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना अवलंबून राहावे लागले. विद्यापीठातील अनेक कर्मचारी तसेच अधिकारी आज सकाळपासून आपापल्या कार्यालयातील संगणकावरच बियाणे खरेदीत व्यस्त दिसून आले.

पाचशे रूपये जास्तीचे

नोंदणी पद्धतीसाठी आधारकार्ड आणि सातबारा उतारा या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार होती. सामान्य शेतकऱ्यांना या बाबी शक्य नसल्याने त्यांनी कॉमन सर्विस सेंटरचा तसेच ऑनलाइन कामे करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. एका नोंदणीसाठी खाजगी लोकांनी शंभर रुपये शुल्क शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याचे एका शेतकऱ्यास सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा कांदा बियाण्याचे दर पाचशे रुपयांनी अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.(Difficulties in purchasing onion seeds online from Rahuri University)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT