dig Shekhar Patil narrated the incident in the case of firing on a dysp by a suspended police officer dig shekhar patil narrated the incident of firing on a dysp by a suspended police officer
अहिल्यानगर

'थोडीशीही चूक झाली असती तर…'; DIG शेखर पाटलांनी सांगितला अनुभव

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : डिग्रस येथे एका घरात घुसून, पिस्तुलाचा धाक दाखवून दोन मुलांना ओलिस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना थोडीशीही चूक घडली असती, तर अघटित घडू शकले असते. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी झटापटीत मिटके बालंबाल बचावले, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सांगितले.


राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे उपस्थित होते. पाटील म्हणाले, की आरोपी सुनील लोखंडे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक आहे. त्याच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याला पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. त्यानंतर त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

डिग्रस येथे एका घरात आरोपीने सकाळी प्रवेश करून, दोन मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून ओलिस ठेवले. त्याला ताब्यात घेताना पोलिस उपअधीक्षक मिटके व पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी बोलण्यात गुंतविले. त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस अटक करतील, असे लक्षात आल्याने आरोपीने पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्यावर गावठी पिस्तूल रोखले. मिटके यांनी आरोपीचा हात पकडला. या झटापटीत पिस्तुलातून एक गोळी सुटली. मात्र, त्यातून मिटके बालंबाल बचावले, असे त्यांनी सांगितले.


त्यापूर्वी, आरोपीने घरातील महिला व तिच्या पतीला धाक दाखविण्यासाठी एकदा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, दोन पिस्तूले व काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आरोपीने पीडित महिलेची सोशल मीडियातून बदनामी केली होती. मागील आठवड्यात पीडितेने आरोपीविरुद्ध विनयभंग, खंडणी, अपहरण व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता, असे ते म्हणाले. आरोपी खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरला होता. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म ॲक्ट, ओलिस ठेवणे, असे गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू आहे, असेही शेखर पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT