Dipotsav at Dnyaneshwar Maharaj Temple 
अहिल्यानगर

दीप उजळले ज्ञानेशांच्या मंदिरी, प्रकाशली नेवासानगरी

सुनील गर्जे

नेवासे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास ७२४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर आज सायंकाळी करण्यात आलेल्या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले.  

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील 'पैस' खांबाचे विधिवत पूजन श्री क्षेत्र देवगड  दत्त देवस्थान चे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, सुनिलगिरी महाराज, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,  सतीश  यांच्या हस्ते झाले. 'पैस' खांबास पहिला दीप अर्पण करून संजीवन सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी ग्रामगीतेच पालन करा त्यातून गाव, जिल्हा, राज्य, व साधुसंत, सामाजिक, राजकीय व्यक्तिमत्व  कसे असावेत याचा त्यातून बोध घेता येईल, त्यासाठी ग्रामगीतेच पारायण करण्याची गरज आहे. असे आवाहन केले. 

दरम्यान उपस्थित संत-महंत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव सुरू झाला.  संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर ७२४ दीप प्रत्येक भाविकांच्या हस्ते लावण्यात आले. दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर उजळून निघाला.  

यावेळी हभप बाळू महाराज कानडे, रामभाऊ जगताप,  जालिंदर गवळी,  भैया कावरे , शिवा राजगिरे,  डॉ. करणसिह घुले, सुधीर चव्हाण  मोहन गायकवाड, पवन गरुड, देविदास साळुंके आदी उपस्थित होते.

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Department: तीन महिने काम अन् तीन महिने घरी थांब; आयकर विभागाचे अफलातून कंत्राटी धोरण, कर्मचारी जगताहेत आश्‍वासनाचा ‘श्‍वास’ घेऊन

‘रा वन’ पुन्हा जिवंत होणार? शाहरुख खानने दिला सीक्वेलचा हिंट

Latest Marathi News Live Update : सरकारकडे सर्व माहिती कर्जमाफीची वाट कसली पाहताय : उद्धव ठाकरे

November 2025 Travel: जयपूर ते वाराणसी; या महिन्यात भारतातील 5 अद्भूत ठिकाणांना द्या भेट

Pune Smart Toilet : पुणे मनपाचा नवा प्रयोग; फिनिक्स मॉलजवळ शहरातले पहिले AC 'स्मार्ट टॉयलेट' सुरू, महापालिकेला खर्च नाही

SCROLL FOR NEXT