Distribution of masks to the citizens by the police in Nevasa taluka
Distribution of masks to the citizens by the police in Nevasa taluka 
अहमदनगर

विनामास्क 'बिनफिकीर्यां'ना गुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी; नेवासेत चौदाशे नागरिकांना समज

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांचच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नेवासे पोलिसांनी या ''बिनफिकीर्यां'च्या विरोधात दंडात्मक कारवाई न करता "जीवाला जप आरोग्याची काळजी घ्या" अशी समज देत गुलाबपुष्प व मास्क देऊन गांधीगिरी अभियान सुरू केले आहे. आत्ता पर्येंत एक हजार चारशे जणांना गुलाबपुष्प व मास्क देऊन सत्कार करण्यात आले. 

हेही वाचा : रेशनसाठी मास्क लावणे बंधनकारक; नो मास्क, नो रेशनचा निर्णय
पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे औचित्य साधून नेवासे पोलिसांनी 'गांधीगिरी' अभियान नेवासे, नेवासे फाटासह आदी बाजारपेठांचा गावांत राबविले. विशेष म्हणजे बिनफिकीर्यांनी पोलिसांच्या या अभियांनाचा धसका घेतला असल्याचे अनेकांनी मास्क बांधणे पसंत करत असल्यावरून दिसून येत आहे. 

नेवासे पोलिसांनी नेवासे शहरात श्री खोलेश्वर गणपती, नगरपंचायत तर नेवासे फाटा येथे राजमुद्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर या चौकांत तर तालुक्यातील कुकाणे, भानसहिवरे, भेंडे, प्रवरसंगमसह आदी गावांत बसथांब, मुख्य चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकी , चारचाकी वाहन चालकांना अडवून समज देत त्यांना मास्क लावून गुलाबपुष्प भेट देऊन सत्कार करून गांधीगिरीने प्रबोधन करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हे अभियान पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळ
शीराम गिते, महेश कचे, दिलीप कुऱ्हाडे, सुहास गायकवाड, बबन तमनर, वसीम इनामदार, गणेश इथापे, मोहन गायकवाड, बाळासाहेब खेडकर हे पोलीस कर्मचारी राबवित आहेत.

साडेचारशे निराधार वृद्धांना किराणा वाटप
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच्या नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी स्वखर्चाने तालुक्यातील विविध गावातील सुमारे साडेचारशेपेक्षा जास्त निराधार वृद्धांना साखर, चहा पावडर, तांदूळ, बेसनपीठ, गोडेतेल, तूरडाळ असे किराणा किटचे वाटप केले. तसेच अडीचशे सॅनिटायझरच्या बाटल्याही पोलीस कर्मचारी, पत्रकार व समाजिक कार्येकर्त्यांनी वाटप केल्या आहे. विशेषतः या किट वाटपाच्या प्रसिद्धीपासून ते दूर राहिले. 

करोना महामारीत अनेक नागरिकां वर वेळोवेळी कारवाई करून देखील कुठलाही परिणाम होत नाल्यासने नेवासे पोलिसांनी हे अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी स्वतःची, परिवाराची व समाजाच्या आरोग्यच्या दृष्टीने मास्क वापरणे, काळजी घेणे महत्वाचे आहे. 
- रणजीत डेरे, पोलिस निरीक्षक, नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT