District Collector Rajendra Bhosale has appealed to submit the balance sheet of Kopargaon water 
अहिल्यानगर

कोपरगावच्या पाण्याचा ताळेबंद सादर करा, जिल्हाधिकारी भोसलेंचे आवाहन

मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : आठ दिवसातून एकदा पाणी अशी स्थिती असलेल्या कोपरगावचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दुसरे महत्वाचे पाऊल उचलले. यापूर्वी पालिकेच्या साठवण तलावाची निम्मी खोदाई मोफत केली होती. आज त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राजेंद्र भोसले यांनी याकामाचे अंदाजपत्रक आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिवन प्राधिकरणाला दिले.

हे ही वाचा : हे मोबाईल अॅप तुम्हाला करील कर्जबाजारी, रिझर्व्ह बँकेने दिल्या सूचना
 
पहिले पाऊल उचलताना त्यांना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी मदत केली. तर उर्वरीत कामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले. मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याकडेही पाठपूरावा सुरू ठेवला. यापूर्वी ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला सूचना दिल्यानंतर तलावाच्या २० फूट खोदाईचे काम मोफत झाले. आणखी २० फूट खोदाई व कॉंक्रेटीकरणासाठी ५० कोटी खर्च अपेक्षीत आहे.

हे काम झाले तर कोपरगावला दिवसातून दोन वेळा पाणी मिळू शकेल. या तलावाच्या शेजारून जलदगती कालवा वहातो. खासबाब म्हणून त्यातून पाणी घेण्याची परवानगी मिळाली तर पाणी उचलण्याचा कुठलाही खर्च न करता हा तलाव भरता येईल. या तलावातूनच चार क्रमांकाचा तलावही भरता येईल. या कामाचे अंदाजपत्रक सरकार दरबारी सादर झाले की निधी मिळविण्यासाठी पाठपूरावा करणे सोपे होईल. जिल्हाधिकारी भोसले यांनी या तलावाच्या कामास भेट देऊन पहाणी केली. 

आमदार काळे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ. अजय गर्जे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरम बागरेचा, सुनील गंगुले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, प्रशांत वाबळे, अनिल सराफ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते. 

शहरासाठी धरणात पाणी आरक्षीत आहे. धरणे भरलेली असताना, केवळ पाणीसाठवण क्षमता अपूरी असल्याने शहरात पावसाळ्यातही वर्षानुवर्षे पाणी टंचाई असते. पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम पूर्ण करून पाणी टंचाई कायमची दूर करायची हे माझे उद्दीष्ट आहे. त्यासाठी पाठपूरावा सुरू आहे. 
- आशुतोष काळे आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT