Double the price of lemons in Shrigonde 
अहिल्यानगर

इथं मिळतोय लिंबांना दुप्पट दर... शेतकऱ्यांना लाभच लाभ 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कोरोनाचा फटका बसलेल्या लिंबूउत्पादक शेतकऱ्यांना नागविण्याचा उद्योग येथे सुरू असतानाच, कालच्या आणि आजच्या लिंबांच्या दरात दुपटीचा फरक दिसून आला. अनेक गावांत दर दहा रुपये किलो होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. 

आवश्‍य वाचा कुकडीच्या पाण्यात श्रीगोंदेकरांची नाकेबंदी नेमकी कोणाच्या इशाऱ्यावरून 

तालुक्‍यात लिंबूबागा असलेल्या सामान्य शेतकऱ्यांना काही दिवस लुटण्याचा उद्योग सुरू होता. कोरोनाच्या लॉकडाउन काळात तर स्थानिक लिंबांचे दर व शहरातील दर यांमध्ये तीन ते चार पट फरक पडत होता. त्यातच गेल्या चार दिवसांपासून 18 रुपये किलोची लिंबे पाच रुपयांवर आणून काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पुरते नामोहरम करण्याचा प्रयत्न चालविला होता. आज "सकाळ'ने त्याला छेद देत व्यापाऱ्यांची ही साखळी उघड केली. 

अनेक गावांतील व्यापाऱ्यांनीही आज कालच्यापेक्षा जवळपास दुप्पट दर देत, लिंबूव्यवसायात काही तरी काळेबेरे आहे, यावर शिक्कामोर्तबच केले. आज बहुतेक ठिकाणी लिंबे दहा रुपये किलोने खरेदी केली जात होती. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांचा एका दिवसात काही लाखांचा फायदा झाला. लिंबांचा दर सायंकाळी समजल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर "सकाळ'चे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट टाकल्या. 

गावोगावी लिंबे खरेदी करणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यांनी वरच्या व्यापाऱ्यांना मनमानी करू देऊ नये. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांची लूट न करता नेहमी दोन्ही बाजूंचा फायदा पाहणारा व्यवसाय करावा. 
- महेंद्र माळी, तहसीलदार 
 
तालुक्‍यात बहुतेक ठिकाणी दहा रुपये दर असताना आढळगाव परिसरात मात्र आजही आठ रुपयांनीच लिंबे खरेदी केली जात होती. लिंबूव्यापाऱ्यांची ही लूट थांबली नाही, तर शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. 
- वैशाली जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य, आढळगाव 

लिंबूव्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या ताटातील अन्न ओढून घेण्याचा प्रयत्न करू नये. नफा कमावताना अशा मार्गाने जाण्याऐवजी शेतकऱ्यांनाही या नफ्यात भागीदार करून घेतले, तर या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. 
- टिळक भोस, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT