Due to this, Nagar Zilla Parishad became a hotbed in the state! 
अहिल्यानगर

यामुळेच झाला नगर जिल्हा परिषदेचा राज्यात बाेलबाला!

दौलत झावरे

नगर  : ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, काही ठिकाणी प्रक्रिया कशी राबवावी, कर्मचाऱ्यांच्या गर्दीचे नियोजन कसे करावे, याचेच नियोजन सुरू आहे. दुसरीकडे, नगर जिल्हा परिषदेने ऑनलाइन पद्धतीने बदलीप्रक्रिया राबवून राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. परिणामी, इतर जिल्ह्यांतील अधिकारी "नगर पॅटर्न'ची माहिती घेऊन त्यानुसार कामकाज करीत आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासकीयऐवजी विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया करण्याची मागणी जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यावर सुरवातीला शासनाने बदल्या न करण्याचे धोरण घेतले; परंतु नंतर ग्रामविकास खात्याने बदलीप्रक्रिया करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला. आदेश प्राप्त होताच, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन बदलीप्रक्रियेचे नियोजन करण्याची सूचना केली. दरम्यान, जिल्हा परिषदेत कोरोनाबाधित सापडल्यामुळे बदलीप्रक्रिया कशी राबवायची, असा पेच उभा राहिला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांना ऑनलाइन बदल्यांची संकल्पना सुचली. ही संकल्पना त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. सर्वांनी त्याला होकार दिला. प्रत्येक तालुक्‍यातील कर्मचारी त्यांच्या मुख्यालयी बोलावून, तेथूनच ऑनलाइन बदलीप्रक्रिया करण्यात आली. परिणामी, जिल्हा परिषदेतील गर्दी कमी होतानाच, बदलीप्रक्रियाही यशस्वी झाली. 

यंदा कौतुकाचा वर्षाव 
मागील वर्षी बदलीप्रक्रियेवरून वादंग झाल्याने राज्यात वेगळ्या अर्थाने चर्चा रंगली होती. मात्र, यंदा बदलीप्रक्रिया पारदर्शक होऊन, "नगरचा पॅटर्न'ची राज्यात चांगल्या अर्थाने चर्चा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्वांचे कौतुक होत आहे. 

बदल्यांना दहा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 
कोरोनामुळे बदल्या करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ग्रामविकास खात्याने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. ही प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्यातील विविध जिल्हा परिषदांतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये बदलीप्रक्रियेबाबत "नगर पॅटर्न'ची चांगलीच चर्चा झडत आहे. काहींनी "नगर पॅटर्न'ची माहिती घेऊन तशी अंमलबजावणी सुरू केली आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

संजय लीला भन्साळींसोबत रिलेशनशिप तरीही अविवाहित आहेत गीता कपूर; का नाही केलं लग्न? सांगितलं खरं कारण

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT