The family in Shrigonda was devastated due to alcohol 
अहिल्यानगर

दारूचं दुकान उघडलं अन त्या कुटुंबात होत्याचं नव्हतं झालं

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : दोनच दिवसांपूर्वी वाईन शॉप उघडण्यास सरकारने परवानगी दिली. तळीरामांसाठी ही आनंदवार्ता होती. परंतु या दारून लगेच रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. एक भाऊ तुरूंगात गेला तर दुसरा देवाघरी. त्यांच्या आईची अवस्था या घटनेने कशी झाली असेल हे सांगता यायचं नाही.

दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देणाऱ्या भावाचा सख्ख्या भावाने रागाच्या भरात दोरीने गळा आवळला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. सोंग करतोय, असे समजून रात्री सगळेच झोपी गेले.

सकाळी उठले, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. एक मुलगा तर गेला, आता दुसऱ्याला तुरुंगवारीपासून वाचविण्यासाठी आत्महत्येचा बनाव करण्यात आला. मात्र, बेलवंडी पोलिसांनी हा बनाव उघड करीत खूनप्रकरणी आईच्या फिर्यादीवरुन मुलाला ताब्यात घेतले.

कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील भापकरवाडी मधील ही घटना काल बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सकाळला माहिती देताना सांगितले, मयताची व आरोपीची आई पार्वती दत्तात्रेय दळवी यांनी फिर्याद दिली आहे.

यातील मयत सोन्याबापु दत्तात्रेय दळवी ( वय 22) या फिर्यादीचा मुलगा असून मयताचा सख्खा भाऊ गणेश दत्तात्रेय दळवी ( वय 20) हा आरोपी आहे. 

बुधवारी रात्री मयत सोन्याबापु हा दारुच्या नशेत आई-वडीलांना मारहाण करीत होता. त्याचा राग अनावर होवून आरोपी गणेश याने सोन्याबापु याच्या गळ्याला दोरी लावून गळफास दिला. मात्र तो मेल्याचे सोंग करतोय असे समजून घरातील सगळे झोपी गेले. 

सकाळी सोन्याबापु मयत झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा बनाव घरातील व्यक्तींनी केला. तसा निरोपही पोलिसांना दिला. मात्र माने यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी घरातील व शेजारील लोकांकडून माहिती काढताना घरातील लोक काही तरी लपवित असल्याचे लक्षात आले.

शेवटी सगळेच कबुल करीत मयताच्या आईने दुसऱ्या मुलाविरुध्द फिर्याद देत सख्या भावानेच सोन्याबापु याचा रागाच्या भरात खून केल्याचे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

Marathi Kannad : 'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'; कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम, नोटीस देऊन कारवाईचे आदेश

संतापजनक! 'जातिवाचक शिवीगाळ करु बार्शीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग'; कोणी नसताना घरात घुसले अन्..

SCROLL FOR NEXT