Financial support to women's self-help groups 
अहिल्यानगर

"मास्क'मुळे बचत गटांना मिळाला "चेहरा'

दौलत झावरे

नगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. मात्र, महिला बचतगटांनी या काळात मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून उत्पन्न मिळविले आहे. जिल्ह्यातील 102 बचतगटांनी पावणेतीन लाख मास्कची निर्मिती करून 38 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचतगटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादनांची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटिंगसाठी जिल्हास्तरावर मार्केटिंग अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला बचतगटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

सध्या कोरोनामुळे मास्कला मागणी वाढली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी सुती कपड्यांपासून मास्क तयार करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील 102 बचतगटांनी पावणेतीन लाख मास्कची निर्मिती केली. त्यांतील दोन लाख 72 हजार मास्कची विक्री झाली असून, त्यातून 37 लाख 95 हजार 100 रुपयांचे उत्पन्न या बचतगटांना मिळाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील बचतगट सहभागी झाले आहेत.

बचत गटांच्या मास्कला प्रतिसाद ः यादव 

कोरोनामुळे मास्कचा तुटवडा जाऊ लागल्यानंतर महिला बचतगटांनी मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, 102 बचतगटांनी 37 लाख 95 हजार 100 रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. 
- परीक्षित यादव, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा 

तालुकानिहाय बचतगटांची संख्या 
शेवगाव ः 16, पाथर्डी ः 18, कोपरगाव ः आठ, नगर ः आठ, राहाता ः सहा, पारनेर ः चार, जामखेड ः दहा, श्रीरामपूर ः एक, संगमनेर ः 12, श्रीगोंदे ः दहा, कर्जत ः चार, अकोले ः पाच. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Minister absence from Cabinet Meeting : शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला का होते गैरहजर?, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...

ती परत येतेय! 11 वर्षानंतर रेखा पुन्हा सिनेमामध्ये पहायला मिळणार, व्या 71 वर्षी पुन्हा झळकणार अभिनयाची जादू

Goa New Rules : गोव्याला जाताय? मग अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर नव्या नियमानुसार द्यावा लागेल हजारोंचा दंड

Horoscope Prediction : मेष ते मीन..संपूर्ण राशीभविष्य! उद्याचा दिवस कसा असेल? कुणाला मिळणार गुड न्यूज अन् कुणाला बॅड न्यूज, जाणून घ्या

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला लागली आग; थोडक्यात वाचला अभिनेता

SCROLL FOR NEXT