Fire at Patil house in Rahuri Khurd 
अहिल्यानगर

पाटील पहाटे सव्वाचार वाजता देवाच्या दैनंदिन पूजेसाठी बाहेर पडले, मुलं झोपलेली होती अन्‌ काही कळायच्या आत घरात अग्नितांडव

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमध्ये एका घरात शनिवारी (ता. २) पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला.

घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. परंतु, पसरलेल्या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपयाच्या वस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव घडले. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. घरासमोरील श्री दत्त मंदिरात दैनंदिन पूजेसाठी पहाटे सव्वाचार वाजता पाटील घराबाहेर पडले. त्यांच्या पत्नी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. घरात दोन मुलगे, एक भाचा, एक भाची झोपलेले होते.  एका खोलीत सिलबंद भरलेले गॅस सिलेंडर ठेवले होते. तेथे अचानक अग्नितांडव सुरू झाले. घरातील सर्वजण तत्काळ बाहेर धावले. गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला.

श्रीदत्तमंदिरात गेलेले पाटील यांनी स्फोटाचा आवाज ऐकून, घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चारही खोल्यांमध्ये आग पसरली. घरातील अंथरून- पांघरून, कपडे, स्टीलची दोन कपाटे, एक फ्रीज, अन्नधान्य, किराणा सामान, घरगुती वापरण्याच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केले. सिलेंडरचा स्फोटाने घराचे दरवाजे, खिडक्या, तावदाने फुटली. सहा महिन्यापूर्वी नवीन घेतलेली एक दुचाकी आगीत भस्मसात झाली.

शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनी घरातील साठवण टाकीतील पाणी बादल्यांनी फेकून, आग विझवण्याचा प्रयत्न केला. महावितरण कंपनीने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आली.

शॉर्टसर्किटची शक्यता..!
श्रीदत्त वसाहत कृषी विद्यापीठाने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यावेळचे घरातील वायरिंग जीर्ण व खराब झालेले आहेत. गॅसचे सिलेंडर ठेवलेल्या खोलीत वीजेच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन, अग्नितांडव सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT