first rain damage sewer in nagar esakal
अहिल्यानगर

पावसाने नगर महापालिकेच्या गटारस्वच्छतेचे पितळ उघडे

सकाळवृत्त सेवा

नगर : शहरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यातच जुलै महिन्यातील पहिल्या मोठ्या पावसाने महापालिकेच्या गटारस्वच्छतेच्या कामांची पोलखोल केली आहे. १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर हा पाऊस झाला. (first-rain-damage-sewer-in-nagar-built-by-municipal-corporation-marathi-news)

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी

शहरात आज दुपारी आकाश ढगांनी दाटून आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दीड तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यात चितळे रस्ता, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, नालेगाव, अमरधाम रस्ता, नीलक्रांती चौक, दिल्ली गेट आदी भागांतील रस्त्यांचा यात समावेश होता. गटारस्वच्छतेची कामे योग्य न झाल्याने पावसाचे पाणी गटारांतून न वाहता गटारांच्या पाण्यासह रस्त्यांवरून वाहत होते. पावसामुळे सायंकाळी शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून येत होते. नालेगाव मंडलाधिकारी कार्यालयासमोर गुडघाभर पाणी जमा झाले होते.

जिल्‍ह्यातही या पावसाने दमदार हजेरी लावली. नगर व श्रीगोंदे तालुक्यांलगतची गावे, श्रीगोंदे तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळिराजा मात्र सुखावला आहे.

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

गटारस्वच्छतेची कामे योग्य न झाल्याने नीलक्रांती चौकात बंद गटारे तुंबली होती. तुंबलेल्या गटारांतील काळे मैलामिश्रित पाणी रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघात

शहरात अमृत भुयारी गटार योजनेची कामे प्रलंबित आहेत. या कामामुळे रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांत गेल्याने, ते न दिसल्याने शहरात दुचाकीस्वारांचे अपघात झाले.

(first-rain-damage-sewer-in-nagar-built-by-municipal-corporation-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Memorial : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकर भावूक

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या एकाच वाक्याने पुन्हा चर्चांना उधाण.

Latest Marathi News Live Update : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा चौकीवर हल्ला; CRPF चे दोन जवान जखमी

Pune Crime: शिरूरमध्ये संतापजनक घटना! ११ वर्षीय मुलीवर वडिलांकडूनच लैंगिक अत्याचार

अण्णांच्या आंदोलनाला BJP-RSSचा छुपा पाठिंबा, सोनिया गांधींच्या पुस्तकात उल्लेख; अण्णा हजारे म्हणाले, कोण...

SCROLL FOR NEXT