bail esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणी माजी उपमहापौरांना जामीन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर केडगाव येथे दोन शिवसैनिकांची (Shivsainik) हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपी महापालिकेतील माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुतर्डीकर यांनी जामीन मंजूर केला आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांना लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आले. त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने रिक्‍त जागेसाठी अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीच्या वादातून केडगावमध्ये ता. 7 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती.

पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भानुदास कोतकर आणि संदीप कोतकर या हत्याकांडातील संशयित सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा प्रारंभी 45 दिवस तपास केला. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण (CID) तपास सोपविण्यात आला.

कोतकर यांना आरोपी करण्यात आल्यावर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तात्पुरता जामिनाची मुदत संपल्यावर त्या फरार झाल्या होत्या.

अॅड. महेश तवले, अॅड.विवेक म्हसे, अॅड. सागर वाव्हळ यांनी कोतकर यांची न्यायालयात बाजू मांडली. अॅड. तवले आणि अॅड. म्हसे यांनी युक्‍तीवाद केला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. सुवर्णा कोतकर यांनी प्रत्यक्षात हत्या केलेली नसल्याचे तपासामध्ये आले आहे. त्यांच्याकडून कोणतीही वस्तू जप्त करावयाची नाही. त्यांचा फक्‍त मोबाईलद्वारे संपर्क झालेला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन द्यावा, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT