Fraud of Rs 6 crore to a trader in the name of GST 
अहिल्यानगर

जीएसटीच्या नावाखाली व्यापाऱ्याला पावणेसहा कोटींना गंडवले

सकाळ वृत्तसेवा

नगर : एमआयडीसील कंपनीला लागणारा कच्चा माला पदेशातून मागविला. तो माल नाव्हाशेवा बंदरावरून आणण्यासाठी कस्टम ड्यूटी, जीएसटीच्या नावाखाली जे.एम. ईडस्ट्रीज संचालक उद्योजक निखिलेंद्र मोतीलाल लोढा यांची सुमारे 5 कोटी 86 लाख 83 हजार 850 यांची फसवणूक झाली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात काल पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपी नवनाथ नारायण गोळे (रा. सुभाषनगर, खोपोली रायगड), लतादेवी यशवंत कांबळे (रा. नवी मुंबई), संतोशी कांबळे, दत्ता (पूर्ण नाव समजले नाही), निशा कुमकर (रा. बेलापूर, नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. या बाबत निखिलेद्र मोतीलाल लोढा (वय 52, रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ माणिक नगर अहमदनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, संशयित आरोपी नवनाथ गोळे व लतादेवी कांबळे-गोळे हे ईशकृपा शिपिंग ऍन्ड लॉजिस्टिक्‍स प्रा. लि. खारघर नवी मुंबई या कंपनीचे संचालक आहेत.

वरील आरोपींनी संगणमत करून कटकारस्थान केले. एक जुलै 2017 ते 15 मार्च 2019 या कालावधीत निखिलेंद्र लोढा यांच्या जे एम इंडस्ट्रीज कंपनीस लागणारा ऍल्युनियमचा कच्चा माल बाहेर देशातून (दुबई, मलेशीया, सिंगापूर) आयात केला आहे.

तो माल न्हावाशेवा बंदरावर आल्यावर तेथील कस्टम ड्यूटी, जीएसटी व संशयित आरोपी यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी लोढा यांच्याकडून 27 कोटी 16 लाख 39 हजार 807 रुपये घेतले. परंतु, वरील कालावधीमध्ये ऍल्युमिनीयमचे कच्चे मालास न्हावाशेवा बंदरावर कस्टम डयूटी, जीएसटी व आरोपी यांचे कामाचा मोबदला याची तपासणी शिपिंग कंपनीने 5 कोटी 86 लाख 83 हजार 850 रुपये जास्त घेतल्याचे लक्षात आले. लोढा यांनी आरोपींकडे जास्तीच्या रक्‍कमेची मागणी केली असता आरोपींनी ती देण्यास नकार दिला. 
...... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karjat Crime: सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले; कर्जत तालुक्यातील घटना, त्रास असाह्य अन् उचलले टाेकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या दोन गटातील वादावर नागपुरात रात्री बैठक

'रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची गरजच काय होती? त्यापेक्षा शुभमन गिलला हटवा'; BCCI ला मिळालाय सल्ला...

Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून; पंढरपूर तालुका हादरला, पती, सासू, सासऱ्याने आवळला गळा, काय घडलं..

Sangli ZP : मतदार वाढले, राजकारण तापले! सांगली जि.प. निवडणुकीत निकाल कोणाच्या बाजूने झुकणार?

SCROLL FOR NEXT