Garbage is being dumped by unknown persons in the forest boundary at Nagpur 
अहिल्यानगर

जंगलात टाकला जातोय कचरा; परिसरात पसरतेय दुर्गंधी

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : नेवासे-शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता.नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरास बकालपणा येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. घनदाट वनराई नटलेल्या या जंगलाला व परिसराला आता 'डंपिंग ग्राऊंड' म्हणून ओळखले जात आहे.

नेवासे-शेवगाव मार्गावर भानसहिवरे- सौंदळे शिवारालगत असलेले नागापूर फाटा येथे परिसरात असलेल्या उजाड माळरानावर वन विभागाने 1985 साली 73 हेक्टर परिसरात वृक्षारोपण करून ती झाडे मोठ्या प्रयत्नांनी जागविली. आज ३५ वर्षात या माळरानावर हजारो हिरवीगार वृक्षराजांनी व्यापले आहे. 

येथील जंगलात हरणांचे कळप, कोल्हे, लांडगे, ससे, मोरांसह अन्य वन्यपशु-पक्षी आहेत. या परिसरात मुबलक गावात, पाला असल्याने या भागात जनावरे, शेळ्या-मेंढया चराईसाठी मोठ्या प्रमाणात असतात. 

दरम्यान गेल्या पाच-सहा वर्षांपासून या जंगलासह परिसराला अज्ञातांची नजर लागली असून येथे वृक्षतोड, गौंनखनिज चोरीचे प्रमाण तर वाढलेच आहे. मात्र यापरिसरात आता अज्ञातांकडून कचरा टाकला जात असल्याने येथे कचरा डेपो निर्माण झाला आहे. अनेकजण रात्रीच्या सुमारास याठिकाणी कागद, कागदाचे पुट्टे, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, लहान फरशीचे तुकडे, जुनी कपडे, काचांचे तुकडे आदीसह मृत जनावरे इतर टाकावू वस्तू येथे मोठ्या प्रमाणावर टाकल्या जाता असल्याने येथे कचऱ्यासह दुर्गधीचे साम्राज्य पसरत आहे.

जनावरांना धोका

या जंगल परिसरात नेवासे-शेवगाव रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना दुर्गधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शेतक-यांची जनावरे याठिकाणी चरायला सोडली जातात. त्यामुळे जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो. 

अज्ञातांकडून रात्री अपरात्री याठिकाणी कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात येत असून कचरा दिसताक्षणी कारवाई करण्यात येणार आहे.
- मुश्ताक सय्यद, प्रभारी वनपाल, नेवासे

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT