Good news ... 21 people win over Corona 
अहिल्यानगर

खुशखबर...नगरमध्ये 21 जणांचा कोरोनावर विजय ! 

सकाळ वृत्तसेवा


नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वेग भलताच वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. तब्बल 90 वर्षांच्या वयाच्या वृद्धांनीसुद्धा कोरोनावर मात करून आपण कोरोनाला हरवू शकतो, हे दाखवून दिले आहे. आज आणखी 21 जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांची संख्या 333वर पोचली आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. जिल्ह्यात 12 मार्चला पहिला रुग्ण आढळला. लॉकडाऊनच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनचे बंधने सैल केल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत गेला. त्यात मुंबई-पुणे येथील कनेक्‍शन जिल्ह्याला चांगलेच भवले आहे. याही परिस्थितीत नगरच्या आरोग्य यंत्रणेला मानावेच लागेल, त्यांनी अहोरात्र सेवा बजावून बाधितांना कोरोनाच्या महामारीपासून सुखरुप बचावले. 

जिल्ह्यात आजअखेर कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असून 500वर जाऊन पोचली आहे. त्यातील तब्बल 333 रुग्णांना कोरोनावर विजय मिळवला आहे. आज कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नगर नऊ, संगमनेर सात, श्रीरामपूर दोन, राहाता, पारनेर, नगर तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT