Good news ... 530 people have won over Corona in the city today 
अहिल्यानगर

गुड न्यूज...आजअखेर नगरमध्ये 530 जणांचा कोरोनावर विजय 

विनायक लांडे

नगर ः एकीकडे जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे दररोज कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचा आकडाही कमालीचा वाढला आहे. आरोग्य यंत्रणेच्या कामाला खऱ्या अर्थाने सलामच करायला हवा. दोन वर्षांच्या बाळापासून ते 90 वर्षांपर्यंत अनेकांनी कोरोना आपण हरवू शकतो हे दाखवून दिले आहे. आज आणखी 36 जणांनी कोरोनावर मात मिळवल्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा तब्बल 530वर पोचला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग भलताच वाढला आहे. दिवसाला 30 ते 60 दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने नगरकरांना चांगलाच घाम फुटला आहे. कोरोनावर अद्याप कुठलीही लस उपलब्ध न झाल्याने नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. विनाकारण भटकणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करताना दिसत आहे. परंतु, स्वयंशिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कोरोनाचा धोका अधिक तीव्रतेने वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दुसरीकडे जिल्हावासियांसाठी दिलादायक बाब म्हणजे नगरकरांना जितक्‍या तीव्रतेने कोरोनाची लागण होते आहे. तितक्‍यात जलदगतीने रुग्ण बरे होऊन घरी परतताना दिसत आहे. आज कोरोनावर मात केलेल्या 36 रुग्णांपैकी महापालिका क्षेत्रातील 13, संगमनेर 14, कोपरगाव एक, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT