The government did not provide facilities to milk producers 
अहिल्यानगर

सरकारने दूधउत्पादकांना वाऱ्यावर सोडले...कोकाटेंचा आरोप

दत्ता इंगळे

नगर : तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथे रास्ता रोको करत महाएल्गार आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.

या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, जिल्हा सचिव अनिल लांडगे, रासपचे तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे, जेष्ठनेते बाजीराव हजारे, रमेश पिंपळे,  यांच्यासह सुभाष निमसे, पोपट साठे, पोपट बनकर, अनिल शेडाळे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन लांडगे, राजेंद्र कोकाटे, आर एस कोकाटे, पोपट शेळके, अनिल गर्जे, शिवाजी बेरड, गणेश खांदवे, किरण गांगर्डे, महेश लांडगे, राजेंद्र लांडगे, मयूर वागस्कर, विनायक म्हस्के, लक्ष्मण कांबळे, गणेश भालसिंग, संदीप म्हस्के, भरत कोकाटे, विजय गाडे, मनोज म्हस्के, सागर गावडे, राहुल गुंड, शुभम शेळके, मनोज गावडे, बाप्पू कोकाटे, संतोष कोकाटे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.   

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुधाचे दर ३२ रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले. यामुळेच दुधाचा दर प्रतिलिटर ३०-३५ रुपये करा, गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या, दुध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्या या मागण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन महाएल्गार करण्यात आले.

यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, “कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी प्रचंड अडचणीत असताना राज्य सरकाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. भाजपा सरकारच्या काळात दुधाला ३-४ वेळा दरवाढ देण्यात आलेली होती. परंतु सद्य परस्थितीत दुधापेक्षा पाण्याची बाटली महाग झालेली असताना देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्याना अपमानास्पद वगणून देण्याचे पाप करत आहे.

राज्य सरकार जो पर्यंत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत आम्ही या विषयावरून मागे हटणार नसून वेळ पडल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे प्रतिपादन या वेळी कोकाटे यांनी केले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सटाण्यात भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची जोरदार एंट्री

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

Uttarakhand Tourism: उत्तराखंडला फिरायला जाताय? लपलेली मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं अनुभवायला विसरू नका!

SCROLL FOR NEXT