Guruji's performance in the battle of Corona is at the forefront 
अहिल्यानगर

कोरोनाच्या लढाईत "गुरुजी' सरस

दत्ता इंगळे

नगर तालुका : कोरोना विषाणूचे मोठे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असला, तरी यामध्ये आरोग्य विभागाचे मोठे श्रम आहेत. त्यांच्या श्रमाला जिल्ह्यातील विविध विभागांनी साथ दिली असून, आता विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षकांचेही हात लागल्याने, प्रबोधनासह विविध कामे वेगाने सुरू झाली आहेत. 

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून, अनेकांचे बळी घेतले आहेत. अनेक जण त्यातून मुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूची लढाई सुरवातीला आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासन करीत होते. त्याला जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची साथ मिळाली. संकट मोठे असल्यामुळे या कामात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा सहभाग असावा, असा विचार प्रशासनाच्या समोर आल्यानंतर शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली.

सुरवातीला शिक्षक घरी राहून विद्यार्थी व पालकांचे कोरोनाबाबत प्रबोधन व जनजागृती करीत होते. मात्र, शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग सुरू झाल्यापासून गावागावांत प्रबोधनाचे काम वेगाने होत आहे.

नगर तालुक्‍यातील 105 गावांत जिल्हा परिषदेच्या 217 शाळा असून, त्या माध्यमातून 867 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. नगर तालुक्‍यात बाहेरील जिल्ह्यांसह परराज्यांतून येणाऱ्यांना शाळांमध्ये क्वारंटाईन केले जात आहे.

या व्यक्तींवर देखरेखीसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गावागावांतील चेक नाकी, स्वस्त धान्य दुकाने, तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणाहून रोज सकाळ- संध्याकाळी उद्‌घोषणा करणे आदी कामे नगर तालुक्‍यातील 867 शिक्षकांपैकी 680 प्राथमिक शिक्षकांकडून केली जात आहेत. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक जण स्वतःला झोकून देऊन कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. 
... 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

Media Freedom Under Threat in Bangladesh: बांगालदेशात आता माध्यम स्वातंत्र्यही धोक्यात!, कट्टरपंथींनी टेलिव्हिजन अँकरला दिली जीवे मारण्याची धमकी

Kasara Ghat Accident : कसारा घाटात अपघातांचे सत्र! सलग दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग तासाभर ठप्प

SCROLL FOR NEXT