Guruvarya Bhaskargiri Maharaj has appealed to all to cooperate with Ramkarya.jpg
Guruvarya Bhaskargiri Maharaj has appealed to all to cooperate with Ramkarya.jpg 
अहमदनगर

रामकार्याला तन मन धनाने सहकार्य करा : गुरुवर्य भास्करगिरी महाराज

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : प्रभू श्रीराम ही राष्ट्रीय देवता असून होणारे मंदिर राष्ट्रीय देवतेचे मंदिर होणार आहे. त्यामुळे सर्व जातीधर्माच्या लोकांचे दायित्व यासाठी आवश्यक आहे. निधी संकलनाच्या माध्यमातून होणाऱ्या रामकार्याला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावे, असे आवाहन क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

नेवासे शहरातील राम मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत गुरुवर्य भास्करगिरी महाराज बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख, हभप नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, उत्तर नगर जिल्हा राष्ट्रीय संघ चालक भरतकुमार निमसे, नेवासे तालुका संघचालक अनंत नळकांडे उपस्थित होते.

प्रास्ताविक स्वप्नील पोतदार यांनी केले तर संतपूजन कृष्णा डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक गुगळे, शंकरराव नळकांडे, सतीश मुळे, सुनिल वाघ, अरविंद मापारी, निखील शिंगवी, राजेंद्र मापारी, विश्वनाथ नानेकर उपस्थित होते. 

दोन लाखाचा निधी जमा 

राम मंदिर निधी संकलन अभियानाच्या नियोजन बैठकीतच  स्मिती व दत्तात्रेय  देशपांडे या दाम्पत्याने एक लाख तर निखील दिपक शिंदे पन्नास हजार व पार्वती शंकरराव गायके यांनी पन्नास हजार असे दोन लाखाचे धनादेश गुरुवर्य भास्करगिरी महाराजांकडे सुपूर्त केला 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT