I love my job ..! 
अहिल्यानगर

आय लव्ह माय जॉब..! 

दौलत झावरे

नगर  : जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात "आय लव्ह माय जॉब' ही संकल्पना राबविली असून, त्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचे अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देतानाच, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत ग्रामपंचायत विभाग मार्गदर्शन करणार आहे. 

अवश्य वाचा : यामुळेच झाला नगर जिल्हा परिषदेचा राज्यात बोलबाला!

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निखिलकुमार ओसवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध संकल्पना राबवून कामात सुसूत्रता आणली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यात आणखी सुसूत्रता यावी, यासाठी "आय लव्ह माय जॉब' ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.

त्या माध्यमातून शासनाचे आदेश, करायची कामे, याची माहिती "आय लव्ह माय जॉब' या संकल्पनेतून तयार होणाऱ्या व्हिडिओतून गटविकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व सरपंचांना पाठविण्यात येणार आहे. 

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत तातडीने पोचविण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून, अनेक ठिकाणी निधी खर्च होणे बाकी आहे.

आता पंधराव्या वित्त आयोगाचा निधी सरकारकडून आला असून, तो ऑनलाइन (पीएफएमएस) पद्धतीने खर्च करायचा आहे. त्यामुळे हा निधी कसा खर्च करायचा, याबाबत ग्रामपंचायत विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

पंधराव्या वित्त आयोगातून कोणती कामे करायची, याबाबत प्रबोधनासह विविध योजनांची माहिती याच माध्यमातून देऊन, त्यातून प्रत्येकाला त्याची जबाबदारी, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, याबाबतचे मार्गदर्शन व्हिडिओद्वारे ग्रामपंचायत विभाग करणार आहे. त्याचा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंचांना फायदा होणार आहे. 

"आपले सरकार'चे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल आव्हाड, सहायक जिल्हा व्यवस्थापक महेश आढाव व विजय पठारे यांनी सलग महिनाभर काम करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. या व्हिडिओचा सर्वांनाच फायदा होऊ लागल्याने, ग्रामसेवकांसह सर्वांनीच त्याचे स्वागत केले आहे. 

जिल्हा परिषदेतील कामे गतिमान होण्यासाठी, कामात सुसूत्रता येऊन प्रत्येकाला कर्तव्यांची माहिती व्हावी, यासाठी "आय लव्ह माय जॉब' ही संकल्पना राबविली आहे. त्यात व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT