IG's team took action in Ahmednagar 
अहिल्यानगर

नाशिक पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाचे नगरमध्ये छापासत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नगर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पथकाने काल सायंकाळी तालुक्‍यातील अरणगाव शिवारात जुगारअड्ड्यावर छापा घालून 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने यापूर्वी शेवगाव, संगमनेर तालुक्‍यांतही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी पथकाने जेऊर (ता. नगर) येथील जुगारअड्ड्यावर छापा घातला होता.

आता अरणगाव शिवारात छापा घालून जुगार खेळणाऱ्या 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 84 हजार 610 रुपये व तीन लाख 70 हजारांच्या दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये ठेकेदार, व्यापारी, शेतकऱ्यांचा समावेश आहे.

योगेश सुपेकर, सागर कोल्हे, जगन्नाथ शिंदे, अल्लाउद्दीन सय्यद, महेंद्र भांबळ, विशाल चांदणे, विजय शिंदे, गोविंद शिंदे, दत्तात्रेय गिरमे, हकील पठाण, भाऊसाहेब तोरडमल, सुनील शितोळे, राहुल गिरे, अनिल बोठे, अनिल दरेकर, दशरथ कांबळे, भाऊसाहेब गायकवाड, गणेश चोबे, भरत चोबे, विकास वराडे, लतीफ शेख, कैलास लष्करे, किरण मुके, संतोष साबळे, विशाल थोरात, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा गेले कुठं? दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटल्यानंतर पोलीस ताफा न घेता एकटेच निघाले

न्यायप्रक्रियेत मोठा बदल! आता खटला चालण्याआधीच निकाल? CJI Suryakant यांचा ‘मास्टर प्लॅन’ उघडकीस!

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली, 'घड्याळा'वरून वाद; शरद पवारांचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; 'वर्षा'वर उद्या होणार बैठक

Ropeway Collapses During Trial ६ वर्षांपासून बांधकाम, १३ कोटी खर्च; ट्रायलवेळी टॉवरसह रोपवे कोसळला

SCROLL FOR NEXT