The incidence of one way in akola Kalsubai Harishchandra Gad Sanctuary has reduced.jpg
The incidence of one way in akola Kalsubai Harishchandra Gad Sanctuary has reduced.jpg 
अहमदनगर

कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात कृत्रिम वणव्याचा भडका नाही ; जाणून घ्या काय आहे कारण?

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन आणि कमी झालेला लोकांचा सहभाग. गेल्या काही कृत्रिम वणव्याचा भडका उडाला नाही, अशी माहिती सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. कळसूबाई हरिश्चंद्र गडाचा परिसर नेहमीच निसर्ग प्रेमी व पर्यटक आकर्षित करतो. वर्षभर येथे पर्यटक येत असतात तर ट्रेकर्स यांचे हे आवडीचे ठिकाण आहे.

वन्य जीवांचे हे माहेरघर आहे. देशाबरोबर राज्यात कोरोनाचे संकट आले, त्यामुळे गेली नऊ महिने या भागात पर्यटक फिरकले नाही. त्यात निसर्गाचे जतन करणारे थोडे व आपला आनंद द्विगुणित करताना निसर्गाला हानी पोहचविणारे अधिक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ही मंडळी या भागात फिरकलेच नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी.पडवळ, अमोल आडे या अधिकारी वर्गाने या परिसरातील गावागावात जाऊन वणवे लागल्यास वन विभागाला कळवा. 

वन्य जीव, कीटक, वनस्पती यांचे अतोनात नुकसान होते तर कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यात गुन्हा आहे. शिक्षेचे स्वरूप गंभीर आहे, हे समजावून सांगितले. ठिकठिकाणी बोर्ड लावून प्रबोधन करून या बाबी पटवून दिल्या. त्यामुळे लोकांचा मोठा सहभाग यात दिसून आला. गत वर्षी साडेतीन एकरवर वणवे लागले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. वन विभागाने ज्या गावांना वणवे लागणार नाही. त्या गावांना पाच हजार रुपये बक्षीस ठेवले होते. त्यात घाटघर, रतनवाडी, पंजारे, कूमशेत, लव्हळवाडी, साम्रदा, उड दावणे या गावांनी सहभाग नोंदवला तर वनविभागाने फायर लाईन ओढून वणवा लागला तरी अधिक आग लागणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे यावर्षी वणवे लागलेच नाही.

संपादन- सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT